मुकेश अंबानींच्या जिओची भरभराट!

मुंबई : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे देशातील उद्योगधंदे बंद होते. सर्व क्षेत्रांना मरगळ आली होती. पण त्याचवेळी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या ‘जिओ प्लॅटफॉर्म’ या कंपनीमध्ये मात्र कोट्यवधींची गुंतवणूक होत आहे.

जिओ कंपनीत गुंतवणूक करण्यासाठी विदेशी कंपन्यांची लाईन लागली आहे. सिल्वर लेक या कंपनीने पुन्हा एकदा जिओ मध्ये ४,५४६ कोटींची गुंतवणूक केली आहे. यापूर्वी सिल्वर लेक ने ५,६५५ कोटींची गुंतवणूक केली होती. जिओ मध्ये आतापर्यंत फेसबुकने (९.९९ टक्के), सिल्वर लेक (२.०८ टक्के), व्हिस्टा (२.३२ टक्के), जनरल अटलांटिक (१.३४ टक्के), केकेआर (२.३२ टक्के) आणि मुबादला (१.८५ टक्के) या कंपन्यांनी पैसे गुंतवले आहेत. यातून जिओ ने ९२,२०२.१५ कोटी रूपये उभे केले आहेत. या कंपनीवर गेल्या वर्षीपर्यंत १,६१,००० कोटी रूपयांचे कर्ज होते. तर आता पर्यंत कंपनीने १,५२,३२७.१५ कोटी रूपयांचा निधी जमा केला आहे.

ब्युरो न्यूज, कोकण नाऊ, मुंबई

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: