23 लाख रक्कम लुटीच्या बनाव प्रकरणी चारही आरोपींना सशर्थ जामीन मंजूर

कणकवली: बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मध्ये भरणा करायची 23 लाख रुपये रक्कम लुटीचा बनाव केल्या प्रकरणी पोलिसांच्या ताब्यात असलेल्या चार आरोपींची सहदिवाणी न्यायाधीश डी. के. पाटील यांनी प्रत्येकी 20 हजारांच्या सशर्थ जामिनावर मुक्तता केली. आरोपींच्या वतीने ऍड. समीर कुलकर्णी, ऍड. अक्षय चिंदरकर यांनी काम पाहिले. याबाबत वैभववाडी पोलिसांत भा द वि कलम 394, 341, 409, 182, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील आरोपी सगुण मनोहर केरवडेकर, विठ्ठल जानू खरात, लाडू उर्फ निखिल सदाशिव वेंगुर्लेकर, किरण प्रभाकर गावडे यांच्यावर वरील कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आरोपी सगुण केरवडेकर हा सुरुवातीला या घटनेची फिर्याद होता. मात्र पोलिस तपासात त्याने सहकाऱ्यांच्या साथीने हा बनाव रचल्याचे निष्पन्न झाले होते. याबाबत आरोपींच्या वकिलांच्या युक्तिवादानंतर चारही संशयित आरोपींची सशर्थ जामिनावर मुक्तता करण्यात आली. या वेळी न्यायालयाने आरोपीनी पोलिस तपासात सहकार्य करणे, साक्षीदारांवर दबाव न आणणे, दर सोमवार व मंगळवारी पोलिस स्टेशनमध्ये हजेरी लावणे अशा अटी वर जामीन मंजूर केला आहे. आरोपींच्या वतीने ऍड. कुलकर्णी व ऍड. चिंदरकर यांनी काम पाहिले.

दिगंबर वालावलकर /कणकवली

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: