​१७​ ​मे पर्यंत आचरा आठवडा बाजारादिवशी बाजारपेठेतील सर्व दुकाने बंद राहणार

आचरा​ :  गुरुवारी आचरा आठवडा बाजारात वाढलेल्या गर्दी मुळे सोशल डिस्टन्सिंगच्या उडालेल्या बोजवाराची गंभीर दखल घेत शुक्रवारी झालेल्या कोरोना आपत्ती निवार समितीच्या सभेत रविवार १७​ ​मे पर्यंत ​येणाऱ्या  तीनही आठवडा बाजारादिवशी आचरा बाजारपेठेतील सर्व दुकाने बंद ठेवण्याबाबत निर्णय ​घेण्यात आला आहे. ​ ​तसेच इतर दिवशी दुकाने सकाळी आठ ते सायंकाळी सात पर्यंत सुरु ठेवण्याबाबत ठरविण्यात आले.
​     ​कोरोना आपत्ती निवारण समिती आचराची सभा सरपंच प्रणया टेमकर यांच्या अध्यक्षतेखाली सोशल ​डिस्टन्स पाळत ग्रामपंचायत सभागृहात संपन्न झाली.​ ​यावेळी त्यांच्या सोबत जिल्हा परिषद सदस्य जेराॅन फर्नांडिस, उपसरपंच पांडूरंग वायंगणकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर, ग्रामविकास अधिकारी गणेश परब,​ ​मंडल अधिकारी पाटील,​ ​लपाचे अभियंता उदयकुमार महाजनी, पोलीस कर्मचारी चव्हाण,​ ​अक्षय धेंडे, ​ ​ग्रामपंचायत सदस्य
आदी  उपस्थित होते​.     ​

कोरोनाच्या  पार्श्र्वभूमीवर आचरा गावचा गुरुवार आणि रविवारचा आठवडा बाजार  २२​ ​मार्चपासूनच अनिश्चित काळासाठी रद्द करण्यात आला होता.​ ​त्यामुळे या काळात केवळ जिवनावश्यक वस्तूंची दुकानेच सुरू होती.​ ​गुरुवारी ग्रामिण भागातील बहुतांशी दुकाने उघडण्यात आल्याने ग्राहकांनी आठवडा बाजार भरणार म्हणून गर्दी केली होती.​ ​यातच रेडझोन मधून ​येणाऱ्यांचे प्रमाण वाढत असल्याने अशा गर्दीत कोरोना पाॅझिटीव्ह असल्यास संसर्गाचा धोका निर्माण होऊ शकतो. या दृष्टीने सावधानता म्हणून रविवारी १०​ ​मे पासून आठवडा बाजारादिवशी संपूर्ण बाजारपेठेतील दुकाने  दिवसभर बंद ठेवली जाणार आहेत.​ ​या दिवशी संपूर्ण बाजारपेठ बंद असल्याने कोणासही बाजारपेठेत कुठलीही वस्तू विक्री साठी बसता येणार नाही.​ ​तसेच सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक गोष्टी न केल्यास​ ​व  सोशल डिस्टसिंग न​ ​पाळल्यास,  संबंधित​ व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे आपत्कालीन समिती अध्यक्षा प्रणया टेमकर यांनी सांगितले​. ​
 शुक्रवार ८​ ​मे पासून  शासनाने परवानगी देण्यात आलेली सर्व आस्थापने सकाळी ८​ ​ते सायंकाळी​ ​७​ ​या काळात सुरू ठेवली जाणार आहेत. तरी व्यापारी बांधवांनी, ग्राहकांनी याची नोंद घेण्याचे आवाहन सरपंच प्रणया टेमकर यांनी केले आहे.

अर्जुन बापर्डेकर, कोकण नाऊ, आचरा. ​

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: