​सावंतवाडीत ​’​जी​’​ पुनरावृत्ती झाली ​’ती’ ​ग्रामपंचायत निवडणुकीत होऊ देऊ नका


दीपक केसरकर यांनी सावंतवाडी पत्रकार परिषदेमध्ये केले आवाहन

सावंतवाडी​:​ सावंतवाडी शहरात  झालेल्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणूकीत चुकीची ​पुनरावृत्ती ग्रामपंचायत निवडणुकीत करु नका​. ​ चुकीच्या  लोकांच्या हातात ​सत्ता  गेली आहे​. ​त्यामुळे सर्वसामान्य लोकांना आणि व्यापाऱ्यांना,भाजीवाल्यांना दिड वर्षात कोणते ​त्रास सहन करावे लागतात ते पहा,आणि सावंतवाडीची पुनरावृत्ती ग्रामपंचायत निवडणूकात होवू देवू नका,असे आवाहन माजी पालकमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी केले.
ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसकडुन झालेली बंडखोरी योग्य नाही,तीनही पक्ष सत्तेत असताना त्यांच्याकडुनच असे का होते? ही चिंतेची बाब आहे.याबाबत आपण काँग्रेसच्या वरिष्ठ मंत्र्यांशी बोलणार आहे.आमचे काय चुकत असेल तर सांगायला हरकत नाही,परंतु थेट बंडखोरी होणे चुकीचे आहे,अशीही नाराजी त्यांनी व्यक्त केली.तसेच जिल्यात आपण मोठया प्रमाणत निधी आणला माञ आज विरोधी याच्या ताब्यात जिल्हापरिषद तसेच अन्य ठिकाणी ते लोक आपण निधी आणला असे ​सांगत आहेत​. ​ त्यामुळं आपण जे काम करत आ​होत  ते लोकापर्यंत पोहचत नाही​. ​ पण आताच्या ग्रामपं​चायत निवडणुकीत मात्र महाविकास आघाडीला साथ द्या असे आवाहन ​त्यांनी  केले​. 

रामचंद्र कुडाळकर , कोकण नाऊ, सावंतवाडी ​​​

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: