​भाताला यावर्षी ​१ हजार ​९६० रुपये हमीभाव जाहीर

​ऑनलाइन नोंदणी सुरू, जिल्ह्यात ​३८ भात खरेदी केंद्र निश्चित

​कणकवली : ​सन ​२०२१-​२२​ हंगामासाठी शासनाने एफ ए.क्यु प्रतीच्या भातासाठी ​१ हजार ​९६० रुपये प्रती क्विंटल दर जाहीर केला आहे. ज्या शेतकऱ्यांना हमीभावाने भात शासकीय खरेदी केंद्रावर विक्री करायचा आहे, त्यांची विक्रीसाठी खरेदी केंद्रावर ऑनलाईन नोंदणी सुरू करण्यात आली आहे. या ऑनलाईन नोंदणीसाठी जिल्ह्यात ​३८ ठिकाणी केंद्र सुरू करण्यात आली आहेत. शेतकऱ्यांनी दि. ​३० सप्टेंबर ​२०२१ रोजीपर्यंत ऑनलाईन नोंदणी करावी असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी चंद्रकांत खाडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केले आहे.

            प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. राज्य शासनाचे अधारभूत किंमत धान खरेदी योजनेकरिता शासनाची मुख्य अभिकर्ता संस्था म्हणून दि महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशन लि. ही संस्था काम पाहते. हंगाम ​२०२१-​२२​ करिता शासनाने एफ ए.क्यु प्रतीच्या धान (भात) करिता ​१ हजार ​९६० रुपये प्रती क्लिंटल दर जाहीर केला आहे. ज्या शेतकऱ्यांना हमीभावाने धान शासकीय खरेदी केंद्रावर विक्री करायचा आहे त्या शेतकऱ्यांकरिता विक्रीसाठी खरेदी केंद्रावर आगाऊ ऑनलाईन नोंदणी सुरू केली आहे. त्यानुसार मार्केंटिंग फेडरेशनच्या जिल्हा का​​र्यालयामार्फत जिल्ह्यात ​३८ ठिकाणी नोंदणी केंद्र सुरू केली असून (​१)सावंतवाडी तालुका सहकारी खरेदी विक्री संघामार्फत सावंतवाडी, मळगाव, मळेवाड, तळवडे, डेगवे, कोलगाव,  मळेवाड, भेडशी. (​२)कुडाळ तालुका सहकारी खरेदी विक्री संघातर्फे कुडाळ, माणगाव, कडावल, कसाल, घोडगे. (​३)शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ लि. कणकवली, (​४)वेंगुर्ला तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लि. वेंगुर्ला, (​५) देवगड तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लि. देवगड, पडेल, पाटगाव. (​६) मालवण तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लि. पेंडूर. (​७) वैभववाडी तालुका खरेदी विक्री संघ लि. वैभववाडी. (​८) सिंधुदुर्ग जिल्हा कृषी औद्योगिक सर्व सेवा सहकारी संघ, लि. ओरोस, कट्टा. (​९) बजाज सिंधुदुर्ग राईस मिल कुडाळ. पिंगुळी, फोंडा, निवजे, आंब्रड, कनेडी, इन्सुली, खारेपाटण, तुळस, हरकुळ खुर्द, हरकुळ बुद्रुक, करुळ, हिर्लोक, पणदूर, चौके, विरण, वेतोरे येथे नोंदणी केंद्र सुरू करण्यात आली आहेत. सदर धान/भात खरेदी ही शासनाच्या ऑनलाईन पोर्टलद्वारे ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी चालू खरीप हंगाम ​२०२१-​२२​ मधील धान (भात) पीक लागवडीची नोंद असलेला डिजिटल स्वाक्षरीचा मुळ सातबारा प्रत, आधार कार्ड व बँक पासबूकची झेरॉक्स सोबत आणावी. शेतकऱ्यांनी नोंदणी केल्यानंतर त्यांना एसएमएस द्वारे नोंदणी क्रमांक दिला जातो. भविष्यात शासनाकडून धान (भात) खरेदीच्या सूचना प्राप्त झाल्यानंतर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना एसएमएसद्वारे खरेदीसाठी बोलवण्यात येईल. शेतकऱ्यांच्या मालाची प्रतवारी तपासून शासनाने ठरवून दिलेल्या निकषांप्रमाणे प्रत्यक्ष खरेदी करण्यात येईल व खरेदी झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर खरेदीची रक्कम वर्ग करण्यात येईल.

            जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालामार्फत शेतकऱ्यांना उपरोक्त ​३८ ठिकाणी भात विक्रीसाठी नोंदणी करण्याकरिता कळविण्यात येत आहे.  धान / भात उत्पादक शेतकऱ्यांनी हमीभावाचा लाभ मिळविणेसाठी सदर केंद्रावर नोंदणी करण्याकरिता आाहन करण्यात येत आहे. सदर नोंदणी कालावधी दिनांक​ ३० सप्टेंबर ​२०२१ पर्यंत राहील. याबाबत शेतकऱ्यांनी अधिक माहिती करिता संस्थेच्या जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग – ओरोस येथे संपर्क करावा. अशी माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकारी खाडे यांनी दिली, असेही प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

दिगंबर वालावलकर​, कोकण नाऊ, ​कणकवली​. ​

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: