​प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र भाट्ये, रत्नागिरी व रिलायन्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नारळ पीक खत व्यवस्थापन विषयी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी कार्यक्रम

सिंधुदुर्गनगरी : ​​प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र भाट्ये, रत्नागिरी व रिलायन्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नारळ पीक खत व्यवस्थापन विषयी दूरदृश्य प्रणालीने (विडिओ कॉन्फेरंस ) सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी ऑनलाइन मार्गदर्शन करताना डॉ. बा​​ळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ अंतर्गत प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र भाट्ये रत्नागिरीचे प्रमुख व कृषि विदयवेत्ता डॉ. वैभव शिंदे यांनी नारळ लागवडीसाठी लागणारी जमिन, हवामान, जाती, रोपांची निवड, लागवड पद्धती, एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, आंतर व मिश्र पिके, कीड व रोग व्यवस्थापन याबद्दल उपस्थित शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन केले.
  यावेळी मार्गदर्शन करताना डॉ.वैभव शिंदे यांनी कोकणातील नारळ लागवडीची सद्यस्थिती व शेतकऱ्यांची पुढील वाटचाल कशी असावी ? याबद्दल मार्गदर्शन केले. महाराष्ट्रामध्ये साधारणतः ५२ कोटी नारळाची फळांचे उत्पादन होते मात्र मागणी मात्र ९८ कोटी नारळ फळाची आहे . महाराष्ट्रात  साधारणता ५० टक्के उत्पादन होते, बाकीची मागणी हि इतर राज्याकडून आयात  केली जाते. यामध्ये सुधारणा करावयाची असल्यास राज्यातील नारळ क्षेत्र वाढले गेले पाहिजे असे आवाहन शेतकऱ्यांना डॉ. वैभव शिंदे यांनी केले. कार्यक्रमध्ये शेतकऱ्यांनी  विचरलेल्या विविध प्रश्नांची शंकांचे सविस्तर मार्गदर्शन डॉ. वैभव शिंदे यांनी केले.
कार्यक्रमाच्या आभार प्रदर्शनात रिलायन्स फाउंडेशनचे रत्नागिरी जिल्हा व्यवस्थापक राजेश कांबळे यांनी रिलायन्स फाउंडेशन करत असलेल्या कामाबद्दल माहिती दिली व रिलायन्स फाउंडेशच्या शेतकऱ्यांसाठी, पशुपालक यांच्या मार्गदर्शनासाठी असलेल्या निशुल्क हेल्पलाईन क्रमांक १८००४१९८८०० वर संपर्क साधण्याचे आव्हाहन शेतकऱ्यांना केले. कार्यक्रमाचे नियोजन रिलायन्स फाउंडेशनचे रत्नागिरी जिल्हा व्यवस्थापक राजेश कांबळे व कार्यक्रम सहायक चिन्मय साळवी यांनी केले. कार्यक्रमध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग व रायगड येथील  नारळ उत्पादक, शेतकरी व बागायतदार यांनी उत्स्फूर्त सहभाग लाभला.


प्रतिनिधी, कोकण नाऊ, सिंधुदुर्गनगरी. ​​

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: