​पीपीई किट, हँडग्लोज उघड्यावर​;​ प्रांताधिकाऱ्यानी घेतली गंभीर दखल

कणकवली : शहरातील मुडेश्वर मैदानानजीक उघड्यावर आढळलेल्या पीपीई किट च्या प्रकाराची प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी गंभीर दखल घेतली आहे. या बाबत तहसीलदार आर जे पवार व तालुका आरोग्य अधिकाऱयांना सूचना देण्यात आल्याची माहिती प्रांताधिकाऱ्यानी दिली. सदर घटनेची माहिती घेण्यात येत असून, सबधितांना सूचना देण्यात आल्याचे तहसीलदार श्री पवार यांनी सांगितले. नगराध्यक्ष समीर नलावडे यांनीही या प्रकाराबाबत संताप व्यक्त केला आहे. कोकण नाऊने याबाबत सर्वात पहिले वृत्त देऊन लक्ष वेधले होते.    

वापरलेली पीपीई किट व हँडग्लोज शासकीय नियमानुसार विल्हेवाट लावण्याची गरज आहे.  पण हा प्रकार कोण करतोय, हे पीपीई किट, हँडग्लोज खाजगी रुग्णालयात की, अन्य कुठे वापरण्यात आले, ते उघड्यावर कुणी टाकले या बाबत माहिती घेण्यात येणार असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ संजय पोळ यांनी सांगितले.

दिगंबर वालावलकर, कोकण नाऊ, कणकवली

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: