​गझलकार मधुसूदन नानिवडेकर यांना श्रद्धांजली​​साठी ​१८ जुलै रोजी शोकसभा

​नानिवडेकर प्रेमींनी उपस्थित राहण्याचे संजय नकाशे यांचे आवाहन

​कणकवली : ​सिंधुदुर्गचे सुपुत्र, जेष्ठ गझलकार, पत्रकार, कवी, अखिल भारतीय गझल संमेलनाचे अध्यक्ष, महाराष्ट्र टाईम्सचे सिंधुदुर्ग प्रतिनिधी कै. मधुसूदन नानिवडेकर यांचे रविवारी (दि. ​११ जुलै)  रोजी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी रविवार,​ १८ जुलै ​२०२१ रोजी सकाळी ​१० वाजता सिंधुभूमी कला अकादमी व माजी आमदार प्रमोद जठार मित्र परिवाराच्यावतीने कासार्डे येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी कै. मधुसूदन नानिवडेकर प्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते संजय विठ्ठल नकाशे (​९४​२२​९८​५०५०) यांनी केले आहे. 

दिगंबर वालावलकर, कोकण नाऊ, कणकवली 

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: