​’एसआरएम’ मध्ये एकनाथ ठाकूर यांची जयंती साजरी

कुडाळ ​: ​ ​तरुण पिढी अधिक गतीशील असून ही पिढी विधायक काम करू शकते. प्रतिमा नुसत्या पुजायच्या नसतात तर त्यांचे आदर्श घेण्यासाठी असतात असे​ प्रतिपादन  ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी ​केले.  येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या माहिती व तंत्रज्ञान (आय.टी) विभागाच्या वतीने माजी राज्यसभा खासदार,​ ​कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष एकनाथ ठाकूर यांची जयंती साजरी करण्यात आली.​ ​त्यावेळी प्रेमानंद गज्वी ​बोलत होते.  ​क.म.शि.प्र.मंडळाचे उपकार्याध्यक्ष भाईसाहेब तळेकर यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले.
​एकनाथ ठाकूर यांच्या जयंती निमित्त महाविद्यालयांत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले होते. ​​ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन ​करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. ​तसेच एकनाथ ठाकूर यांच्या प्रतिमेला भाईसाहेब तळेकर यांनी पुष्पहार अर्पण केला.​ ​या प्रसंगी​ ​ठाकूरसाहेबांच्या कार्याचा आढावा घेणारी चित्रफीत दाखविण्यात आली.​ दिवसभर विविध शैक्षणिक कार्यक्रम व स्पर्धा  घेण्यात आल्या​. ​ राज्यातल्या विविध महाविद्यालयांनी स्पर्धेत सहभाग घेतला. ​   ​

यावेळी मार्गदर्शन करताना श्री. गज्वी म्हणाले, पुरुषांनी स्त्रियांकडे बघण्याची मानसिकता बदलली पाहिजे आणि असे विविध विषय नाटकातून मांडण्याची जबाबदारी आमच्यासारख्या नाटककारांची असते असे ते म्हणाले.​ ​एकनाथ ठाकूर यांच्याशी आपला परिचय ​​’देवनवरी​’​ या एकांकिकेच्यावेळी मुंबईत कसा झाला​,​ ही आठवण त्यांनी कथन केली. प्रतिकूल परिस्थितीचा सामना ठाकूर साहेबांनी केला​. ​ठाकूर साहेबांचा उच्चपदापर्यंतचा प्रवास थक्क करणारा असून त्यांचा आदर्श  विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे असे ते म्हणाले.​     ​

क.म.शि.प्र.मंडळाचे उपकार्याध्यक्ष भाईसाहेब तळेकर यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन करताना क.म.शि.प्र.मंडळाच्या वाटचालीस ठाकूर साहेबांचे योगदान कसे मिळाले ते संगितले.ठाकूर साहेबांनी आमच्या संस्थेला ‘दृष्टीकोन’ दिल्याचे त्यांनी आवर्जून संगितले.​ ​आरती प्रभू व वसंत देसाई यांचे स्मारक उभारण्याचे स्वप्न ठाकूर साहेबांचे होते आणि ते पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी असल्याची त्यांनी सांगितले.
​    आपल्या प्रतिकूल परिस्थितीचे भांडवल न करता ठाकूर साहेबांनी यश मिळविल्याचे महाविद्यालयाचे ज्येष्ठ प्राध्यापक डॉ.​ ​व्ही.​ ​बी.​ ​झोडगे यांनी आपल्या भाषणात सांगितले​. ​ त्यांच्या हस्ते उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.​ ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांचा परिचय प्रा.​ ​संतोष वालावलकर यांनी केला.​ ​प्रास्ताविक प्रा.​ ​दिलीप पाटील यांनी केले.​ ​ज्येष्ठ ​रंगकर्मी  चंदूकका शिरसाट​, ​माजी विद्यार्थी पी.डी.शिरसाट,​ ​विवेक देसाई, प्रा.​ ​प्रशांत केरवडेकर,​ ​पुण्याचे प्रा.सुशांत खड्ड आदी उपस्थित होते​. विद्यार्थ्यांनी सूत्रसंचालन व आभार मानले. यावेळी  प्रा.​ ​डॉ.​ ​एस.​ ​के.​ ​पवार, प्रा.​ ​डॉ.​ ​ए.​ ​एन.​ ​लोखंडे,​ ​प्रा.डॉ.​ ​व्ही.​ ​जी.​ ​भास्कर,​ ​प्रा.​ ​डॉ.​ ​शरयू आसोलकर,​ ​प्रा.​ ​डॉ.​ ​तुपेरे,​ ​प्रा.​ ​कमलाकर चव्हाण आदी उपस्थित होते.

निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ. ​

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: