​आमदार नितेश राणे यांचे आता मिशन “उदय सामंत”

​उदय सामंत, किरण सामंत यांच्या भ्रष्ट्राचाराची चौकशी करण्याची किरीट सोमय्या यांच्याकडे मागणी

या संदर्भातील पुरावे सादर करण्याचा पत्रात उल्लेख

​कणकवली : ​आमदार नितेश राणेंनी भाजपाचे फायरब्रँड नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याकडे अर्ज करतात सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या संदर्भात एक तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत म्हटले आहे आपणाकडून तीन पक्षांच्या महाविकास आघाडी सरकारने गेल्या दोन वर्षांमध्ये महाराष्ट्रामध्ये केलेल्या प्रचंड भ्रष्टाचाराची प्रकरणे सद्या बाहेर काढली जात असून भविष्यात महाराष्ट्र राज्य भ्रष्टाचार मुक्त होण्याच्या दृष्टीने आपण उघडलेल्या मोहीमेमुळे महाराष्ट्रीय जनतेला निश्चितच अभिमान वाटत आहे . सद्या कोकणात विशेषतः रत्नागिरी  व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले अनील परब व  उदय सामंत यांनी सत्तेच्या माध्यमातून गैरमार्गाने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे. त्या पैकी अनील परब यांची चौकशी आपल्या तक्रारीवरून सुरू आहे. त्याच प्रमाणे उदय सामंत व त्यांचे पडद्या मागून भ्रष्ट कारभार सांभाळणारे बंधू  किरण सामंत यांनी दोन्ही जिल्ह्यांमधील शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून गैरमार्गाने पैसा जमा करून त्याचा वापर राजकारणासाठी करण्याचा सपाटा लावला आहे. अशी तक्रार आमदार नितेश राणे यांनी माजी खासदार भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांच्याकडे केली आहे . किरण सामंत यांची मे . आर . डी . सामंत कन्सट्रक्शन कंपनी असून तीच्या मार्फत दोन्ही जिल्हयामधील करोडो रूपयांच्या कामांचे ठेके पदरात पाडून अधिकाऱ्यांवर दबाव टाकून निकृष्ट दर्जाची कामे केली आहेत . त्यामध्ये बोगस कंत्राटदार उभे करून त्यांचे मार्फत कामे केली जात आहेत . त्याचप्रमाणे मत्स्य व्यवसाय विभागामार्फत पर्ससीन नेटधारक व एल . ई . डी . धारक यांचेकडून करो​​डो रूपयांची वसुली दरमहा करण्यात येत असल्याबाबत मी मत्स्य व्यवसाय मंत्री अस्लम शेख यांचेकडे तक्रार केली आहे . त्याचप्रमाणे व्हाईस चॅन्सलर नियुक्त्यांमध्येही गैरमार्ग अवलंबल्याचे पुरावे आपणाकडे लवकरच सादर करीत आहोत . अशाप्रकारे मंत्री श्री . उदय सामंत व त्यांचे बंधू  किरण सामंत यांनी सर्व प्रशासकीय यंत्रणा हाताशी धरून गैरमार्गाने पैसा जमा करून त्याचा वापर राजकारणासाठी करण्याचा प्रयत्न सुरू केल्याने जनतेमध्ये असंतोष निर्माण झाला आहे . तरी भ्रष्ट कारभाराची चौकशी होऊन कारवाई होणे गरजेचे आहे . याबाबतचे सर्व पुरावे लवकरच आपणास सादर करण्यात येतील असे राणे यांनी किरीट सोमय्या यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

दिगंबर वालावलकर​, कोकण नाऊ, ​कणकवली​. ​

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: