२६ ते ३० सप्टेंबर या पाच दिवशी हृदयाची सर्वात महत्त्वाची स्ट्रेस टेस्ट तपासणी सवलतीच्या शुल्कात

कुडाळ : जागतिक हृदयरोग दिनाच्या निमित्ताने माधवबाग कुडाळ सावंतवाडी आणि कणकवली या तीनही शाखांच्यावतीने २६ ते ३० सप्टेंबर या पाच दिवशी हृदयाची सर्वात महत्त्वाची स्ट्रेस टेस्ट तपासणी सवलतीच्या शुल्कात करण्यात येणार आहे. ही तपासणी केल्यामुळे हृदयाची ताकद आणि हृदयाचा रक्तपुरवठा कळण्यास मदत होते. तरी इच्छुकांनी नावनोंदणी करून या स्ट्रेस टेस्ट शिबिरात सहभागी व्हावे. यासोबत दिनांक २६ सप्टेंबर रोजी सकाळी ७ ते ११.३० च्या दरम्याने तीनही क्लिनिक्समध्ये ब्लड कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. या रक्त तपासणी शिबिरामध्ये रक्ताच्या ६० तपासण्या ९९९/- मध्ये आणि रक्ताच्या ६३ तपासण्या १५९९/- मध्ये करण्यात येणार आहेत. तरी गरजूंनी खाली दिलेल्या  क्लिनिक्सच्या नंबरवर कॉल‌ करून आपल्या जवळच्या क्लिनिकमध्ये नावनोंदणी करून या ब्लड कॅम्पमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन तीनही क्लिनिकच्यावतीने करण्यात येत आहे.

कुडाळ ९०११३२८५८१
सावंतवाडी ७७७४०२८१८५
कणकवली ९३७३८८८८८८


ब्युरो न्यूज, कोकण नाऊ, कुडाळ. ​​

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: