हि किरण गावकर यांची जगातील दुसऱ्या क्रमांकाची कामगिरी ठरेल – प्रमोद जाधव 

​कडावल :  सिंधुविकास शेड्युल कास्ट इंडस्ट्रियल को. ऑप. सोसायटी लि. शिवडाव, ता. कणकवली या  संस्थेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या जैविक कोळसा प्रकल्पाला शुभेच्छा देताना  सिंधुदुर्गचे जातपडताळणी समाजकल्यांचे उपयुक्त प्रमोद जाधव यांनी किरण गावकर यांच्या कर्तृत्वाचे कौतुक केले. आणि शुभेच्छा दिल्या.
यावेळी शुभेच्छा देताना प्रमोद जाधव म्हणाले, हा प्रकल्प उभा राहणे हा सर्वांच्या दृष्टीने  आनंदाचा क्षण आहेच पण तो माझ्या आणि जयंत चाचाकर यांच्या दृष्टीने आनंदाची गोष्ट आहे. आपल्याकडे मोठ्या प्रमाणात आढळणाऱ्या  रानमोडी वनस्पतीचा उपयोग करणारे किरण गावकर आणि त्यांचा हा प्रकल्प हा  जगातले दुसरे आहेत.  पहिला प्रयोग नेपाळ मध्ये झाला होता.  ७५० किलो रानमोडी आणि ७५० लिटर गोमूत्र मिळून १५०० किलो खत दिल्यावर शेती उत्पादन दुप्पट झाले हा पहिला प्रयोग होता. आणि गावकरांचा हा दुसरा प्रयोग आहे.  हा जर दुसरा प्रयोग यशस्वी झाला तर जगातले हे दोन क्रमांकाचे गृहस्थ ठरतील. रानमोडी डोकेदुखी आहे. तिचा जैविक कोळशासाठी उपयोग होत आहे हि खूप मोठी गोष्ट आहे. किरण गावकर यांचा तांत्रिक अभ्यास चांगला आहे. त्यांनी मार्केटिंचा विचार केला आहे.  यंत्र सामुग्री,  काच्चमाल यांचा अभ्यास केला. गोव्यात मार्केट शोधले. याचा खूप गौरवपूर्ण उल्लेख श्री.जाधव यांनी आपल्या भाषणात केला. दिव्यांग बांधवांसाठी विशेषतः कर्ण बधिर मुलांसाठी काहीतरी करावे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.​​

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: