हा उद्योग तरुणांसाठी प्रेरणादायी – आम. नितेश राणे 

​सिंधुविकासच्या जैविक कोळसा प्रकल्पाचे नितेश राणे यांच्या हस्ते उदघाटन 

​१०० टक्के महिला कर्मचारी असणारा राज्यातील पहिला उद्योग

​कडावल : माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांच्या प्रोत्साहनातून किरण गावकर यांनी या उभा केलेला उद्योग निश्चितच कोकणातील तरुणांना प्रेरणादायी आहे. म्हणूनच अशा उद्योगांना प्रेरणा दिली पाहिजे. जोपर्यंत या जिल्ह्यातील तरुण उद्योजकतेकडे वळत नाहीत तोपर्यंत सिंधुदुर्ग बदलणार नाही, असे प्रतिपादन कणकवली, देवगड, वैभववाडी मतदार संघाचे आमदार नितेश राणे यांनी काढले.  सिंधुविकास शेड्युल कास्ट इंडस्ट्रियल को. ऑप. सोसायटी लि. शिवडाव, ता. कणकवली या  संस्थेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या जैविक कोळसा प्रकल्पाच्या उदघाटन सोहळ्यात​ ​राणे बोलत होते.  
​​कडावल येथे  सिंधुविकास शेड्युल कास्ट इंडस्ट्रियल को. ऑप. सोसायटी लि. शिवडाव, ता. कणकवली संचालित बायोमास ब्रिकेटिंग प्लँट अर्थात जैविक कोळसा उत्पादन प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पाचे  उदघाटन आमदार नितेश राणे यांच्या हस्ते झाले. आमदार नितेश राणे यांचे कार्यक्रम स्थळी आगमन झाल्यावर सर्वप्रथम त्यांनी कोनशिलेचे अनावरण केले. त्यानंतर त्यांनी फीत कापून इमारतीचे उदघाटन केले. नन्तर इमारतीमध्ये छत्रपती शिवाजी  महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. नन्तर समाज कल्याण विभागाच्या मुंबई विभागाच्या प्रादेशिक आयुक्त श्रीमती वंदना कोचुरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. नन्तर आमदार नितेश राणे यांच्या हस्ते मशिनरीचा शुभारंभ करण्यात आला. आमदार नितेश राणे आणि मान्यवरांनी मशिनरीची माहिती घेतली.  नन्तर आमदार नितेश राणे आणि उपस्थित मान्यवरांनी प्रकल्पाची पाहणी केली. त्यांनतर सर्व मान्यवरांचे व्यासपीठावर आगमन झाले. त्यावेळी उदघाटन सोहळ्याचा शुभारंभ आमदार नितेश राणे आणि मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाला.
या कार्यक्रमाला  समाजकल्याण विभागाच्या मुंबई विभागाच्या प्रादेशिक आयुक्त श्रीमती वंदना कोचुरे, तसेच माजी जि प अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, सौ. संजना संदेश सावंत, प्रमोद जाधव, उपायुक्त, समाजकल्याण, जातपडताळणी, सिंधुदुर्ग, जयंत चाचरकर, सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण सिंधुदुर्ग, धर्मराज गोसावी, वरिष्ठ समाजकल्याण निरीक्षक, प​. स​. ​ सदस्य सुनील मेस्त्री, अरविंद परब, दादा साईल,  सौ. स्नेहा सुनील ठाकूर, सरपंच, ग्रा.पं. कडावल, संस्थेचे सचिव किरण गावकर, तज्ज्ञ संचालिका सौ. ज्योती गावकर, अध्यक्ष अजित हरिश्चंद्र तांबे, संचालक प्रदीप वासुदेव गावकर, कुलदीपक विजय जाधव आणि सर्व संचालक मंडळ आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविकातून किरण गावकर यांनी प्रकल्प उभारणीमागचा उद्देश स्पष्ट केला. हा उद्योग उभारण्याची प्रेरणा नारायण राणे यांच्यामुळेच मिळाल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
     यावेळी बोलताना आमदार नितेश राणे म्हणाले,  पश्चिम महाराष्ट्रासारखी मानसिकता सिंधुदुर्गातल्या तरुणात निर्माण झाली पाहिजे. आपल्या भागात कोणता उद्योग चालेल, कोणत्या भागात कशाची मागणी आहे यासाठी इंटरनेटचा वापर केला पाहिजे. शासकीय अधिकारी प्रामाणिकपणे गावकरांच्या पाठीशी उभे राहिले म्हणून हा प्रकल्प उभा राहिला आहे. आपला उद्योग वाढला कसा पाहिजे याचाच विचार करा. नफा वाढला तर जास्त रोजगार देऊन शकाल. कोकणातील उद्योग बघायचे  असतील तर या प्रकल्पाला भेट द्या असं मी बाकीच्या आमदारांना सांगेन. सात मधून एका उद्योगला मान्यता मिळते.  तो ताकदीतने उभा राहतो. हि खूप मोठी गोष्ट आहे. गावकरांनी जिद्द चिकाटी दाखवली. त्याबद्दल त्यांचे कौतुक. अशा कार्यक्रमातून तरुणांनी मोठी प्रेरणा घेतली पाहिजे. वर्षाच्या सुरुवातीला अशी प्रेरणा मिळत असेल तर २०२१ वर्ष चांगलेच जाणार. पण शासनाकडून सगळंच एकाच भागाला मिळत असेल तर त्याचा विचार झाला पाहिजे. राणे साहेब २०१४ पर्यंत  राज्य शासनात होते तो पर्यंत कोकणला सर्व मिळत होते. पण २०२१ नंतर कोकणला चांगले दिवस येणार आहेत. असे आमदार राणे याणी ठामपणे सांगितले.
यावेळी  माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत,  समाजकल्याण विभागाच्या मुंबई विभागाच्या प्रादेशिक आयुक्त श्रीमती वंदना कोचुरे, जयंत चाचरकर, सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण सिंधुदुर्ग,  प्रमोद जाधव, उपायुक्त, समाजकल्याण, जातपडताळणी, सिंधुदुर्ग, यांनी या उद्योगाला शुभेच्छा दिल्या. यावेळी पहिली मशीन ऑपरेटर सोनिया बुटेलो हीच आमदार नितेश राणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच अनेक मान्यवरांचा देखील सत्कार करण्यात आला. १०० टक्के महिला कर्मचारी असलेला हा राज्यातील पहिला प्रकल्प असल्याने सर्वानीच या प्रकल्पाचे विशेष कौतुक केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदेश तांबे यांनी केले तर आभार प्रदर्शन संस्थेचे अध्यक्ष अनिल तांबे यांनी केले. कार्यक्रमाला अनेकजण शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते.

निलेश जोशी, कोकण नाऊ, कडावल​​. 

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: