सोनुर्ली माय माउलीचा लोटांगण उत्सव संपन्न

हजारो भाविकांनी माऊली चरणी घातली लोटांगणे; माऊलीच्या जयनामात परिसर दुमदुमला, देशातील कोरोनाचे संकट पूर्ण जाऊ दे ! सोनुर्ली माउली चरणी गावच्यावतीने वतीने सांगणे 

सावंतवाडी : दक्षिण कोकणचं पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील वलोटांगण जत्रोस्तव म्हूणन प्रसिद्ध असणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली गावच्या व दक्षिण कोकणचे पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोनुर्ली येथील श्री देवी सोनुर्ली माऊली देवीचा वार्षिक लोटांगण जत्रोत्सव काल रात्री अवकाळी पाऊस असून पण थाटात संपन्न  झाला. लाखो भक्तांची मायमाऊली असणाऱ्या सोनुर्ली माऊलीच्या चरणी आज असंख्य भक्तगणयानी चरणी लिन होऊन लोटांगण घातली. मोठ्या प्रमाणात भक्तगण याची गर्दी झाली होती. रीतीरिवाजप्रमाणे रात्री ११ नंतर लोटांगण कार्यक्रम सुरु झाला. प्रथम पुरुषांची लोटागणनंतर महिला यांची लोटांगण सुरु झाली. पाऊस असूनही शिस्तबध्दरित्या लोटांगण उत्सव संपन्न झाली. ढोलताशाच्या गजरात अवसारी देवाच्या सानिध्यात भाविकानी लोटांगण घातली.
 भक्ताची गर्दी अलोट होत असल्याने सकाळपासून सोनुर्ली माउली देवस्थान कमिटी व पोलीस प्रशासनने योग्य नियोजन केले होते. यावेळी मंदिर परिसर वाढविल्या भक्ताची होणारी गर्दी नियंत्रणात आली. मोठ्या प्रमाणात सर्वप्रकारची दुकाने हॉटेल स्टॉल्स जत्रेला लागले. एसटी वाहतूक बंद व पाऊस यामुळे थोडा परिणाम व्यापारी वर्गावर झाला. देवीच्या दर्शनासाठी सिंधुदुर्ग जिल्हा भक्तगणांबरोबरच गोवा, कर्नाटक, बेळगाव, मुंबई, कोल्हापूर तसेच अन्य राज्यातून लाखो भाविक जत्रोत्सवाला दर्शनासाठी आले होते.

रामचंद्र कुडाळकर, कोकण नाऊ, सावंतवाडी

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: