सोनाळी वाणीवाडी येथील युवकाची गळफास लावून घेत आत्महत्या

वैभववाडी : सोनाळी वाणीवाडी येथील प्रवीण नागेश गोसावी वय 25 या युवकाने गळफास लावून घेत आत्महत्या केली. ही घटना आज पहाटेच्या सुमारास घडली. या घटनेची खबर मयत प्रवीण चे मामा दत्ताराम नारायण गोसावी रा. सोनाळी यानी वैभववाडी पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी घटनास्थळी जावून मृतदेह ताब्यात घेतला.
प्रवीण गेली अनेक महिने सोनाळी येथे मामाच्या गावी राहत होता. महिन्याभरापूर्वी तो मुंबईला जाऊन आला होता. मंगळवारी रात्री सोनाळी येथे मामा दत्‍ताराम गोसावी यांच्या घरी प्रवीणने आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही.
या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक अतुल जाधव, पोलीस नाईक मारुती साखरे, राहुल पवार, श्री बिल्पे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. शवविच्छेदन नंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेचा अधिक तपास पोलिस नाईक राहुल पवार करत आहेत.

प्रतिनिधी, कोकण नाऊ, वैभववाडी

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: