सुरक्षित वातावरणात आनंदाने शिक्षण घ्या !

प्रभारी गटशिक्षणाधिकारी प्रजापती थोरात

देवगड : शासनादेशाप्रमाणे आज1 डिसेंबर पासून पहिली ते सातवीच्या शाळा नियमितपणे सुरू होत आहेत. त्यानिमित्ताने आदर्श शाळा देवगड शाळा या शाळेला देवगड तालुक्याचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी थोरात यांनी भेट देऊन उपस्थित विद्यार्थी व पालक शिक्षक यांचे स्वागत केले आणि शाळा सुरू करताना आवश्यक सोयी सुविधांची पाहणी केली. आरोग्य विषयक सूचनांची माहिती दिली आणि सर्व विद्यार्थ्यांना नियमित शाळेत येण्याचे आवाहन केले. यावेळी शालेय व्यवस्थापन समिती सदस्य, पालक, मुख्याध्यापक राजम, उपशिक्षक सचिन जाधव, वेदा साळसकर, मुणगेकर आदि उपस्थित होते.

प्रतिनिधी, कोकण नाऊ, देवगड

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: