सुखनदी ने ओलांडली धोक्याची पातळी; खारेपाटण मुख्य बाजारपेठ रस्त्यावर पुराचे पाणी

खारेपाटण -चिंचवली रोड वर पाण्याखाली

खारेपाटण -बंदरवाडी रोड पाण्याखाली

गेल्या काही दिवस मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे खारेपाटण सुखनदी ने धोक्याची पातळी ओलांडली असून खारेपाटण मुख्य बाजारपेठ रस्ता पुराच्या पाण्याखाली गेला असून येथील वाहतूक बंद झाली आहे तसेच खारेपाटण -चिंचवली रोड वर पाण्याखाली गेला आहे खारेपाटण -बंदरवाडी रोड पाण्याखाली गेला आहे त्यामुळे खारेपाटण ला जोडणाऱ्या चिंचवली ,बंदर वाडी येथील रस्त्यावर पाणी आल्याने येथील लोकांचा देखील खारेपाटण शी संपर्क तुटला आहे. पुराचे पाण्याची पातळी वाढत चालल्याने नागरिकांनि काळजी घेण्याची आवाहन करण्यात येत आहे.

अस्मिता गिडाळे, कोकण नाऊ, खारेपाटण

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: