सुखनदीमध्ये धरणाचे पाणी सोडण्यात आल्याच्या अफवांना पूर

खारेपाटण : सुखनदी मध्ये धरणाचे पाणी सोडण्यात आले आहे अशी चर्चा सध्या खारेपाटण गावामध्ये चांगलीच रंगलेली आपल्याला पाहायला मिळतेय  मात्र पाटबंधारे विभाग व मंडल अधिकारी, तसेच खारेपाटण सरपंच यांच्याकडून माहिती घेतली असता, कोणत्याही धरणाचे पाणी सुखनदी मध्ये सोडण्यात आले नसुन तशी कोणतीही अधिकृत सुचना नाही त्यामूळे अश्या कोणत्याही अफवेला ग्राह्य धरू नये असे सांगण्यात आले आहे.

        खारेपाटण हे गाव सुखनदी काठी वसलेले सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्य प्रवेशद्वार आहे. सुखनदी काठी वसलेले हे गाव असल्याने येथे वारंवार पूराचा फटका मोठ्या प्रमाणात खारेपाटण गावाला बसतो. मंगळवार दिनांक ६ ऑगस्ट रोजी खारेपाटण गावाला पुराचा वेढा होता, या पुराचा त्रास खारेपाटण सह पंचक्रोशीतील सर्वच लोकांना सहन करावा लागला होता. पावसाचे प्रमाण वाढले की सुखनदी च्या पाण्याच्या पातळीत नेहमीच वाढ होत असते हे पाणी खारेपाटण घोडेपाथर येथील मुख्य रस्त्यावर येते त्यामुळे बंदरवाडीतील लोकांना खारेपाटण येथे येण्यासाठी मुख्य रस्त्यावरील वाहतूक बंद होते, चिंचवली रोड वरील कोंडवाडी रस्त्यावर देखील पाणी येते यामुळे खारेपाटण-चिंचवली मार्ग वाहतुकीसाठी बंद होतो. या सर्वाचा त्रास खारेपाटण सह आजूबाजूच्या लोकांना भोगावा लागतो. त्यानंतर शुक्रवार दिनांक ९ ऑगस्ट ला संध्याकाळी सुखनदी च्या पाण्यामध्ये अचानक वाढ झाली होती त्यामुळे सुखनदी चे पाणी कोंडवाडी, घोडेपाथर रस्त्यावर आले होते त्यामुळे खारेपाटण पंचक्रोशीतील लोकांमध्ये चर्चा चालू होती की सुखनदीमध्ये धरणाचे पाणी सोडण्यात येते परंतु लोकांचा हा गैरसमज होत असून पाटबंधारे विभाग व मंडल अधिकार्यांकडून तसेच खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत यांच्याकडून माहिती घेतली असता कोणत्याही धरणाचे पाणी सोडलेले नसुन तशी कोणतीही अधिकृत सुचना नाही. त्यामूळे अश्या कोणत्याही अफवेला ग्राह्य धरू नये असे सांगण्यात आले आहे.

           वरच्या पट्यात जोरदार पाऊस झाला की सुखनदी च्या पाण्यात वाढ होते. आणि त्यामुळे सतत पुराचा धोका खारेपाटण ला कायम आहे आणि भविष्यात हा धोका टाळण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करून खारेपाटण पूरग्रस्त ठिकाण निर्धोक करण्यासाठी ठोस पावले उचलने गरजेचे आहे.


अस्मिता गिडाळे, कोकण नाऊ, खारेपाटण. 

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: