सिंधुदुर्ग व रत्नागिरीतील आंबेडकरी चळवळी​तील कवी व गायकांची उद्या बैठक


वैभववाडी: आंबेडकरी विचारांचा प्रचार व प्रसार करून मनोरंजनातून प्रबोधन करणाऱ्या सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील कवी , गायक यांची महत्त्वाची बैठक रविवार दि .२४ जानेवारी रोजी सकाळी ११.३० वा.खारेपाटण येथे आयोजित करण्यात आली आहे . डॉ.बाबासाहेबांचे विचार जनमानसात पोहचवून मनोरंजनातून प्रबोधन करण्याचे काम आंबेडकरी चळवळीतील कवी , गायकांनी केले आहे.​ ​अलिकडच्या काळात ही प्रबोधनाची चळवळ लोप पावत चालली आहे.​ ​या  प्रबोधनाची चळवळ पुन्हा गतिमान करण्यासाठी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या क्षेत्रात काम करणारे कवी व गायक यांना संघटीत करण्यासाठी व पुढील दिशा ठरविण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.तरी या बैठकीला दोन्ही जिल्ह्यातील कवी व गायक यांनी उपस्थित राहावे.असे आवाहन आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ कवी जनीकुमार कांबळे , प्रकाश आजविलकर , श्रीपत कुसूरकर यांनी केले आहे .
उमेश बुचडे​,​ कोकण नाऊ​,​ वैभववाडी​​

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: