सिंधुदुर्ग जिल्हा इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या अध्यक्ष पदी राजन नाईक तर विकास गावकर यांची सचिव पदी निवड

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा इलेक्ट्रॉनिक्स मिडीयाच्या अध्यक्षपदी राजन नाईक, सचिवपदी विकास गावकर तर खजिनदारपदी विनायक वंजारे यांची निवड करण्यात आली आहे.ही निवड आज कणकवली मध्ये जाहीर करण्यात आली.कणकवली येथे आज सिंधुदुर्ग जिल्हा इलेक्ट्रॉनिक्स मीडियाची बैठक महेश सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झाली यावेळी विजय गावकर, राजन नाईक, विजय पालकर, अनंत पाताडे, विकास गावकर, विनायक वंजारे हे उपस्थित होते यावेळी राजन नाईक यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. राजन नाईक हे ई टीव्हीच्या माध्यमातून आणि दूरदर्शनच्या माध्यमातून गेली चोवीस वर्षे पत्रकारिता करीत आहेत. राजन नाईक यांच्या निवडीचा प्रस्ताव विजय गावकर यांनी मांडला, त्याला सर्व सदस्यांनी सर्वानुमते सहमती दर्शविली यानंतर विकास गावकर यांच नाव सचिवपदासाठी राजन नाईक यांनी सुचवलं यालाही सर्वानुमते संमती देण्यात आली त्यानंतर खजिनदारपदी विनायक वंजारे यांची निवड सर्वानुमते करण्यात आली ही निवड पुढील तीन वर्षासाठी म्हणजे 2026 पर्यंत रहाणार आहे.
यावेळी सर्व सदस्यांनी नाईक गावकर व वंजारे यांचे अभिनंदन केले. या बैठकीत महेश सावंत, विजय गावकर, विकास गावकर, राजन नाईक व विजय पालकर हे फाउंडर मेंबर असल्याने आजीवन सभासद राहतील अशा प्रकारचा ठराव मांडण्यात आला तर राज्यस्तरीय इलेक्ट्रॉनिक्स मीडिया मध्ये काम करणाऱ्या प्रतिनिधींनी सदस्य ई मीडियामध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी अशा प्रकारचा प्रस्ताव अध्यक्ष व सचिव यांच्याकडे सादर करावा असा निर्णय घेण्यात आला. तसेच सिंधुदुर्ग जिल्हा इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या वतीने दरवर्षी पत्रकार दिन साजरा करण्याचा निर्णय झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका उत्कृष्ट इलेक्ट्रॉनिक्स मिडियातील पत्रकाराला आदर्श पत्रकार तर एका राजकीय नेत्यांची आदर्श राजकीय नेता म्हणून गौरविण्याचा निर्णय घेण्यात आला.निवडण्यात आलेली कार्य करिणी पुढील तीन वर्षासाठी राहणार आहे या तीन वर्षात विविध कार्यक्रम आयोजित करून इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही राजन नाईक, विकास गावकर व विनायक वंजारे यांनी दिली

ब्युरो न्यूज, कोकण नाऊ, कुडाळ

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: