सिंधुदुर्गातील ऊसतोडणी लवकर होण्यासाठी कारखान्यांच्या प्रतिनिधीं सोबत बैठक घ्या

कणकवली : ​सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ऊस शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत तातडीने लक्ष देत शेतकऱ्यांना दिलासा दिला पाहिजे. दसऱ्याच्या मुहूर्तावर साखर कारखाने सुरू होणार आहेत. त्याच दरम्यान ऊस तोडणी ही सुरू करण्यात येणार आहे. गेली अनेक वर्ष कोकणातील ऊस जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात शिवाय तोडणी केला जात नाही.जानेवारी महिन्यात तर ऊस जाळून तोडला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. या ऊसाचा प्रतिटन ४०० रुपये दर कमी मिळतो. तर उशिरा तोडल्यामुळे उसाचे वजन कमी होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. ऊस तोडून झाल्यावर शेतकऱ्यांना प्रति टनाला ट्रकात भरण्यासाठी ४०० रुपये द्यावे लागतात. तोडणी व भरणे मिळून प्रति टन ८०० ते ९०० रुपये चा खर्च शेतकऱ्यांना येतो. शासनाचा उसाचा प्रतिटनाचा दर २८०० रुपये असला तरी शेतकऱ्यांना प्रत्यक्षात १८०० ते १९०० रुपये दर मिळतो. प्रत्यक्ष खर्च व उत्पन्न याचा ताळमेळ बसत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडतो. कोकणातील शेतकऱ्या एवढा, इतर ठिकाणी ऊस शेतीसाठी खर्च येत नाही. ऊस शेतीच्या समस्यांबाबत कोकणातील शेतकऱ्यांनी अनेकदा तक्रारी केल्या. मात्र त्याचा काहीच उपयोग झालेला नाही. याउलट कोकणातील शेतकऱ्यांकडे वाकड्या नजरेने बघण्याची काम कारखानदारांकडून होत असते. यामुळे कोकणात ऊस शेतीची लागवड घटली असून, शेतकरी ऊस शेतीकडे वळण्यास धजावत नाहीत. त्यामुळे डी वाय पाटील साखर कारखान्याचे प्रतिनिधी व जिल्ह्यातील ऊस शेतकरी यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ऊस तोडणी लवकरात लवकर बैठक घेण्यात यावी व्हावी अशी मागणी सुरेश सावंत यांनी आमदार नितेश राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

दिगंबर वालावलकर​, कोकण नाऊ,​ कणकवली​. ​​​

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: