सामाजिक अंतराचे पालन करुन घरघर मे योग – जिल्हा शल्य चिकित्सक 

सिंधुदुर्गनग​री  ​:​ सन ​२०१५ पासून दि. ​२१ जून रोजी संपुर्ण जगभरामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून उत्साहाने साजरा करण्यात येत आहे. योगाचा संबंध आरोग्याशी असल्याकारणाने सार्वजनिक आरोग्य विभागातील आयुष विभागाच्या माध्यमातून जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग तसेच जिल्ह्यातीलआयुष संस्थामध्ये आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात येतो.
यावर्षीदेखील केंद्रशासनाने ​२१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस कार्यक्रम साजरा करण्याविषयी कळविलेले आहे. परंतु सध्या देशात कोविड ​- १९ आजाराचा प्रादुर्भाव असल्याने मोठ्या प्रमाणात लोकांनी एकत्रीत येण्यास बंदी घालण्यात आली आहे. यामुळे प्रत्येकाने योग प्रात्यक्षिके-आसने घरामध्येच करण्यावर भर देणात आला आहे. याकरीता ​६ वा आंतरराष्ट्रीय योग दिवसाची संकल्पना घरघर मे योग  ही ठेवण्यात आलेली आहे.
या संकल्पनेवरुन प्रत्येक व्यक्तीने घरामध्ये कुटुंबासोबत राहून सामाजिक अंतराचे पालन करुन योगाभ्यास करणेबाबतचा विचार मांडेणत आला आहे. घरामध्ये राहून योगाभ्यास केल्यामुळे संसंर्गजन्य कोरोना विषाणुपासून बचाव होऊ शकतो. तसेच योगाभ्यासामुळे कोरोनाच्या साथसदृश्य  परिस्थितीमध्ये श्वसन संस्था व रोगप्रतिकार शक्ती यांचे बळकटीकरण करण्यास मदत होऊ शकते. यानिमित्ताने दिनांक ​२१ जून ​२०२० रोजी सकाळी ​७.​०० ते ​७.​४५ पर्यंत प्रत्येकाने घरीच योग प्रात्यक्षिके करावीत असे आवाहन  जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.
या दिनाचे औचित्य साधुन जिल्हा रुग्णालयाच्या आयुष विभागाच्या माध्यमातून दिनांक ​२१ जून ​२०२० रोजी जिल्हा रुग्णालयामध्ये आंतराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी कळविले आहे.​​


​ब्युरो न्यूज, कोकण नाऊ, सिंधुदुर्ग.  ​​ 

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: