“समर्थ बूथ अभियानातून” माजी खासदार निलेश राणे यांनी जपली सामाजिक बांधिलकी

निलेश राणे यांचा ओरोस मंडळात गावभेट दौरा

कुडाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानिमित्त्त आयोजित ‘सेवा आणि समर्पण’ सप्ताहात “समर्थ बूथ अभियान” अंतर्गत माजी खासदार निलेश राणे यांनी ओरोस मंडळात गावभेट दौरा आखला. निलेश राणे यांनी गावागावात जात गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. कोणताही डामडौल न ठेवता माजी खासदार निलेश राणे यांनी भक्तिभावाने गणेशासमोर हात जोडून वंदन केले. यावेळी दौऱ्यात माजी खासदार निलेश राणे यांनी आपुलकीने चौकशी केली. घरातली लहान मुले असो वा ज्येष्ठांशी आदराने बोलून गणरायाचे दर्शन घेतले.
या अभियानामध्ये भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल, भाजपचे युवा नेते विशाल परब, सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब, जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, जिल्हा कार्यकारणी सदस्य आनंद शिरवलकर, जिल्हा परिषदेचे सदस्य लॉरेन्स माणेकर, पंचायत समिती सदस्य बाळू मडव, ओरोस मंडल सरचिटणीस देवेंद्र सामंत, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पप्या तवटे, विनोद सावंत, मनोरंजन सावंत, प्रितेश गुरव, योगेश घाडी, अमित तावडे आदी त्यांच्यासोबत उपस्थित होते.

ब्युरो न्यूज, कोकण नाऊ, कुडाळ

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: