सभापती तळेकर यांनी जाणून घेतले कळसुली विभागातल्या आठ गावचे प्रश्न व समस्या 

कणकवली : कणकवली पंचायत समितीचे सभापती दिलीप तळेकर यांच्या संकल्पेनेतून पंचायत समिती आपल्या दारी हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत  सभापती तळेकर यांनी शनिवारी कळसुली विभागातल्या हळवंल गावाला भेट दिली. कळसुली परिसरातल्या आठ गावच्या ग्रामस्थांनी आपल्या समस्या तळेकर यांच्या समोर मांडल्या. त्या सोडवल्या जातीलच पण भविष्यातली संभाव्य पाणी टंचाई दूर करण्यासाठी या ठिकाणी आलो असलीच सभापती दिलीप तळेकर यांनी यावेळी सांगितलं. 

पंचायत समिती आपल्या दारी या उपक्रमांतर्गत शनिवारी संध्याकाळी तीन वाजता हळवल ग्रामपंचायत सभागृहात आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी व्यासपीठावर सभापती दिलीप तळेकर, उपसभापती दिव्या पेडणेकर, पंचायत समिती सदस्य मिलिंद मेस्त्री, हळवल सरपंच गुरव,गटविकास अधिकारी मनोज भोसले सहाय्यक गटविकास अधिकारी श्री मिसाळे ,तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर पोळ, विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग,जिल्हा परिषद बांधकामाचे उपसभापती तसेच प्रत्येक पंचायत समितीमधील खाते निहाय अधिकारी कर्मचारी व ८ गावचे पंचायत समिती, ग्रामपंचायत सदस्य, आरोग्य कर्मचारी, शिक्षक वृंद, कृषी सेवक, अंगणवाडी सेविका, उपस्थित होते.
हळवल ग्रामपंचायत कार्यालयात पंचायत समिती आली आपल्या दारी या कार्यक्रमात ग्रामस्थांनी आपल्या विविध मागण्या पंचायत समिती सभापती दिलीप तळेकर यांच्या समोर मांडल्या. वागदे, हळवल,शिरवल,कळसुली,बोर्डवे, कसवण-तळवडे, ओसरगाव गावातून आलेल्या सरपंच आणि  ग्रामपंचायत सदस्य यांनी आपल्या भागातले विविध  प्रश्न मांडले. कळसुली विभागातील ८ गावांमध्ये प्रमुख मुख्य समस्या म्हणजे पाणीटंचाई. सर्वच गावातल्या  काही वाड्यांवर पाणीटंचाई, रस्त्याची दुरवस्था, वन्य प्राणीचा हैदोस, कळसुली गावातल्या  क्रेशर आणि  गौण खनिजाचा नाहक त्रास ग्रामस्थांना सहन करावा लागतोय. त्यामुळे २६ जानेवारीला कळसुली ग्रामस्थांनी  जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर  उपोषण करण्याचा पवित्रा घेतला आहे. सर्व कळसुली विभागातल्या सर्व  सरपंच आणि ग्रामस्थांनी आम्हाला सहकार्य करावं अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. कळसुली शिरवल हळवल मुख्य मार्गावरील डंपर वाहतूक वेळीच निर्बंध घाला, अशी मागणी देखील कळसुली विभागातल्या आठ  गावच्या ग्रामस्थांनी केली आहे.  यावेळी सभापती तळेकर  तुमच्या मागण्या लवकरात लवकर मार्गी लावण्यात येतील असे आश्वासन ग्रामस्थांना दिले.   
पहिला दौरा आहे, शेवटचा नाही, जूनमध्ये पुन्हा दौरा करणार असून आता ज्या आपण समस्या मांडल्या आहेत. त्या समस्या कागदावर न ठेवता सर्व समस्या सोडवण्यासाठी  आम्ही कटिबंध असल्याची ग्वाही सभापती दिलीप तळेकर यांनी कळसुली विभागातल्या  ग्रामस्थांना दिली. 

विराज गोसावी, कोकण नाऊ, कणकवली

JUMP Net
Mai Hyundai Aura

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: