सबसिडीच्या नावाखाली पॉवर टिलर खरेदीत शेतकऱ्यांची फसवणूक

सावंतवाडी – सावंतवाडी पंचायत समितीची मासिक बैठक त्यामध्ये अनेक विषय समोर आले, सबसिडी मिळवून देऊ असे सांगत जिल्ह्यातील काही डीलर शेतकऱ्यांची दिशाभूल करत त्यांना पॉवर टिलर विकत घेण्याची सक्ती करत आहेत. त्यामध्ये शेतकऱ्यांची आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोप पंचायत समिती सदस्य श्रीकृष्ण उर्फ बाबू सावंत यांनी केला. याला खुद्द तालुका कृषी अधिकारी माधुरी मुटके यांनीही दुजोरा दिला. हा प्रकार गंभीर असून याची तसेच संबंधित डीलरना लेखी पत्रव्यवहार करुन कारवाई करावी अअसा निर्णय घेण्यात आला,
सावंतवाडी पंचायत समितीची मासिक बैठक आज उपसभापती शितल राऊळ यांच्या अधयक्षतेखाली ऑनलाइन पार पडली, यावेळी व्यासपीठावर सहाय्यक गटविकास अधिकारी वासुदेव नाईक पंचायत समिती सदस्य श्रीकृष्ण उर्फ बाबू सावंत गौरी पावसकर आदी उपस्थित होत्या. बैठकीमध्ये विभागवार चर्चा झाली यावेळी कृषी विभागाअंतर्गत झालेल्या चर्चेत सदस्य श्रीकृष्ण सावंत यांनी कृषी यांत्रिकीकरण योजने बाबत नाराजी व्यक्त केली. तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी असतानाही शासनाकडून आहेत,निधी उपलब्ध झाल्याने शेतकरी पॉवर टिलर च्या लाभापासून वंचित राहिले आहेत आज बऱ्याच शेतकऱ्यांना लाभ मिळाल्याने छोटे ट्रॅक्टर खरेदी केले आहेत. मात्र या योजनेच्या नावाखाली काही शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे.

संबंधितांकडून कोणताही प्रकारचा ऑनलाईन प्रस्ताव कृषी विभागाकडे केला नसतानाही त्यांना पॉवर टिलर खरेदी करण्यास सांगितलं आहे व सबसिडी देण्याची ग्वाही देण्यात आली आहे. त्यामुळे अनेक शेतकरी आज सबसिडीच्या प्रतीक्षेत आहेत. याबाबत तालुका कृषी अधिकारी मुटके यांनी खुलासा करताना काही पॉवर टिलर सप्लाय करणारे डीलर असे प्रकार करत आहेत. मात्र शेतकरी त्यांना बळी पडतात. पॉवर टिलर ऑनलाइन लॉटरी पद्धतीसाठी पुन्हा एकदा शासनस्तरावर पाठपुरावा सुरू आहे , असे सांगण्यात आले,

रामचंद्र कुडाळकर कोकण नाऊ सावंतवाडी

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: