सतीश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली चिपळूण भाजप युवा मोर्चातर्फे मदतकार्य

चिपळूण​ : दहा दिवसांपूर्वीच कोकणातील किनारपट्टीच्या भागात ‘निसर्ग’ वादळाने हाहाकार माजवला होता. यावेळी रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर आणि दापोली या दोन तालुक्यांना तर वादळाचा मोठा फटका बसला. येथील अनेक गावं वादळाच्या तडाख्यात सापडून गावांतील राहती घरे आणि बागायतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दापोली तालुक्यातील केळशी गावामध्ये  ​चिपळूण भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून दि.१२ जून रोजी मदतकार्य करण्यात आले​. ​ ​          केळशी गावात अनेक झाडं जमीनदोस्त झाली आहेत तर विजेचे खांबही वाकले असून काही अंतर्गत रस्ते बंद झाले आहेत. ​
या ठिकाणी चिपळूण भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून पाच वुड कटिंग मशीन्सच्या साहाय्याने अनेक घरांच्या आजूबाजूचा परिसर तसेच बागायतीमध्ये साफसफाई करण्यात आली​. ​सोबतच अंतर्गत रस्ते आणि पाणवठ्यापर्यंत जाणारे रस्ते मोकळे करून देण्यात आलेत. काही ठिकाणी घरांवर झाडे पडली होती तीही बाजूला करून देण्यात आली आणि येथील ग्रामस्थांना पुढील आठवडाभर पुरेल एवढं शुद्ध पाणी वाटप करण्यात आलं. सदर​च्या​ मदतकार्यात ​येथी ​ग्रामस्थांचे तसेच अनेक प्रतिष्ठित व्यक्तींचे सहकार्य लाभले.
या मदतकार्यात भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष रामदास राणे,​ ​भारतीय जनता पार्टी​​चे जेष्ठ सुधीर भागवत,सतीश मोरे, निवृत्त एअर मार्शल हेमंत भागवत, युवा मोर्चेचे परेश चितळे, साहिल रानडे, वेदांत पवार, सोहम खेडेकर, ओंकार नाचणकर, किशोर काते, साहिल गाडेकर, आनंद केतकर,ओंकार जोशी यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला​ होता​. सदर उपक्रमासाठी भारतीय जनता पार्टी​​चे जेष्ठ नेते सुभाषराव शिंदे, तसेच प्रभंजन पिंपुटकर ,साहिल रानडे, अमेय फणसे, राजू खेडेकर, शिंदे, ओंकार नाचणकर यांचे आर्थिक सहकार्य लाभले.​​

ब्युरो न्यूज, कोकण नाऊ, चिपळूण. 

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: