सचिन वाझेची कामोठे परिसरात सापडली आऊटलँडर गाडी

नवी मुंबई- सचिन वाझे याच्या मालकीचे कोल्हापुरात गाड्यांचे शोरूम आहे. त्यामुळेच एनआयएला सचिन वाजे यांच्या प्रॉडो, इनोव्हा, स्कॉर्पिओ, मर्सिडीज बेंज, वोल्वो आशा डझनावारी गाड्या सापडत आहेत. आता नवी मुंबईच्या कामोठे येथे सचिन वाझे याच्या मालकीची सुमारे २५ लाख रुपये किमतीची आउटलँडर गाडी एनआयएला सापडली आहे. गेल्या महिन्यापासून कामोठे येथील एका सोसायटीच्या आवारात ही गाडी पार्क करून ठेवलेली होती.
कामोठे येथील सेक्टर ७ मधील शीतल गारा को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या आवारात ही गाडी बरेच दिवस पार्क करून ठेवली होती, असे स्थानिक रहिवाशांनी पोलिसांना सांगितले. पुढील तपासात ही गाडी सचिन वाझे नावाच्या व्यक्तीची असल्याचे आढळून आले. वाझे यांचे नाव येताच एनआयए घटनास्थळी दाखल झाली व त्यांनी ही आउटलँडर गाडी ताब्यात घेतली. एनआयएने आतापर्यंत सचिन वाझे यांच्याशी संबंधित दोन मर्सिडीज बेंज, एक प्रॉडो, एक इनोव्हा, एक स्कॉर्पिओ, गाड्या ताब्यात घेतल्या आहेत. आता आउटलँडर गाडी ताब्यात आली आहे. आणखी एका ऑडी आणि स्कोडा गाडीच्या शोधात एनआयए आहे.

ब्युरो न्यूज, कोकण नाऊ, नवी मुंबई

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: