श्रीरामवाडी येथील नृत्य स्पर्धेत मृणाल सावंत प्रथम

कुडाळ ​: श्रीराम सुरसंगम मित्रमंडळ श्रीरामवाडी आयोजित खुल्या एकेरी नृत्य स्पर्धेत पिंगुळी कुडाळची मृणाल सावंत विजेती ठरली खुल्या एकेरी नृत्य स्पर्धेत ​३१ स्पर्धक सहभागी झाले होते
    श्रीरामवाडी येथे एकनाथ षष्ठी महोत्सवाच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदाही  खुल्या एकेरी नृत्य स्पर्धेचे आयोजन  श्रीराम रंगमंचावर रविवारी रात्री ता ​१५ करण्यात आले होते​. ​ एकनाथ षष्ठी निमित्त गेले सात दिवस विविध सांस्कृतिक धार्मिक आदी भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते​. ​ एकेरी नृत्य स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले​. ​ या स्पर्धेत द्वितीय क्रमांक नेहा जाधव​,​ तृतीय स्नेहल करंबेळकर​,​ उत्तेजनार्थ पुजा राणे व  भक्ती जामसंडेकर यांना देण्यात आला​. ​ विजेत्यांना अनुक्रमे रुपये ​१० हजार ​२१ रु सात हजार​ ​​२१ रू पाच हजार​ ​​२१ उतेजनार्थ रु  ​१५२१/-व ​१०२१/- व आकर्षक चषक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले​.     ​

मंडळाचे यावर्षीचे स्पर्धेचे ​२१ वे वर्ष होते स्पर्धेचे परीक्षण जगदीश उगवेकर पखवाजवादक महेश परब यांनी केले​. ​ यावेळी श्रीराम ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष भानुदास कोचरेकर​,​ ​उपाध्यक्ष सुरेश कोचरेकर​,​ परमेश्वर कोचरेकर​,​ श्रीराम सुरसंगम मित्रमंडळाचे अध्यक्ष गुरुनाथ सारंग​,​ सचिव दया पराडकर​,​ विठोबा केरकर​,​ राजन कोरगावकर​,​ श्री नवार​,​  प्रेमचंद्र कोचरेकर​,​ सहदेव केरकर​,​ राजन खवणेकर​,​  आबा कोचरेकर​,​ मनीष केरकर​,​ विनायक खवणेकर​,​ प्रल्हाद सारंग​,​ मंडळाचे कार्यकर्ते पदाधिकारी आदी उपस्थित होते​. ​ सूत्रसंचालन विठोबा केरकर यांनी केले​. ​

ब्युरो न्यूज, कोकण नाऊ, कुडाळ.

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: