शेअरबाजार उघडताच सेन्सेक्स १३०० अंकांनी कोसळला; निफ्टीही ३८० अंकांनी खाली

मुंबई : सोमवारी शेअर बाजार उघडताच मोठी घसरण पहायला मिळाली. सेन्सेक्स १,२५७.५६ अंकांनी कोसळून ४७,५७४.४७ अंकांवर स्थिरावला होता. तर निफ्टीदेखील ३७९.१० अंकांनी घसरुन १४,२३८वर स्थिरावलेली पहायला मिळाली. शेअर बाजारात या आठवड्यामध्य मोठ्या प्रमाणात चढ-उतार पहायला मिळू शकतो. या आठवड्यातील कोरोना प्रसार, जागतिक स्तरावरील घडामोडी आणि मोठ्या कंपन्यांच्या तिमाही अहवालावर शेअर मार्केटची दिशा ठरणार आहे. बुधवारी रामनवमीच्या निमित्ताने शेअर बाजाराला सुट्टी राहणार आहे.

ब्युरो न्यूज, कोकण नाऊ, मुंबई

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: