शिवाजी परब यांनी महसूल विभागात केलेले काम कौतुकास्पद!

शिवाजी परब यांच्या सेवानिवृत्तीपर सत्कारप्रसंगी प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांचे गौरवोद्गार

कणकवली : महसूलसारख्या विभागात एवढी वर्ष प्रामाणिकपणे सेवा बजावून आलेल्या प्रत्येक अभ्यागतांना नाराज न करण्याचे कौशल्य शिवाजी परब यांनी भाऊसाहेब बनून बजावले. त्यांना महसूल विभागात असलेल्या कामाच्या अनुभवाची प्रांताधिकारी कार्यालयाला पुढील काळातही गरज असणार आहे. एवढी वर्षे सेवा बजावल्यानंतर आपल्या कुटुंबालाही त्यांनी वेळ द्यावा. महामार्ग चौपदरीकरणाच्या मोबदला वाटपाच्या क्लिस्ट कामात परब यांनी घेतलेली मेहनत व केलेले काम हे उल्लेखनीय असेच आहे असे गौरवोद्गार कणकवली प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी काढले. कणकवली प्रांताधिकारी कार्यालयात कार्यरत असलेले अव्वल कारकून शिवाजी परब उर्फ परब भाऊसाहेब यांच्या सेवानिवृत्तीपर सत्कारप्रसंगी राजमाने बोलत होत्या. यावेळी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते. परब यांना गेल्या अनेक वर्षांचा महसूल विभागात असलेला अनुभव येत्या काळात मार्गदर्शक म्हणून आम्हाला कार्यालयीन कामासाठी व्हावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. यावेळी नायब तहसीलदार नाईक व अन्य कर्मचारी उपस्थित होते. यावेळी भेटवस्तू देऊन शिवाजी परब यांचा प्रांताधिकारी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

दिगंबर वालावलकर, कोकण नाऊ, कणकवली

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: