शिवाजी परब यांचा कणकवली नगराध्यक्षांच्या हस्ते सत्कार

शिवाजी परब यांनी केलेल्या आतापर्यंतच्या कार्याचा हा गौरव

कणकवली : प्रांताधिकारी कार्यालयातील अव्वल कारकून शिवाजी परब यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते परब यांचा सत्कार करण्यात आला. परब यांनी कणकवली शहरात सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडा विषयांमध्ये योगदान दिले आहे. त्यांच्या महसूल विभागातील कारकिर्दीमध्ये जनतेची कामे करण्यास त्यांनी प्राधान्य दिले. त्याबद्दल त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून हा सत्कार असल्याचे उद्गार नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी याप्रसंगी काढले. यावेळी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, गटनेते संजय कामतेकर, उद्योजक विवेक खोत, महेश खोत आदी उपस्थित होते.

दिगंबर वालावलकर, कोकण नाऊ, कणकवली

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: