शिवसाम्राज्य प्रतिष्ठानाच्या वतीने शिवजयंती उत्सवाचे आयोजन

वैभववाडी : फोंडाघाट शहरामध्ये शिवसाम्राज्य प्रतिष्ठानाच्या वतीने शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ५:०० वाजल्यापासून विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. कार्यक्रमाची सुरुवात शिवगड येथून शिवज्योत पूजन व प्रस्थान करून होईल. त्यानंतर शिवप्रतिमेची मिरवणूक शहरातुन काढण्यात येईल व प्रतिष्ठापना होईल. ओंकार कला मंच यांच्या नृत्य व नाट्य कार्यक्रमाचे खास आयोजन उत्सवानिमित्त करण्यात येणार आहे. यावेळी सर्वांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

उमेश बुचडे, कोकण नाऊ, वैभववाडी.

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: