वैभव घुगे यांच्या पहिल्या ‘लगी पडी’ला प्रेक्षकांची पसंती

म्यूजिक अल्बमला यूट्यूबवर एक आठवड्यात ५०० हज़ार व्यूज

मुंबई : वैभव घुगे हे भारतातील सर्वात प्रसिद्ध डान्सर आणि कोरियोग्राफर आहेत. वैभ यांनी ‘डान्स इंडिया डान्स सीझन ३’ सारख्या डान्स रियालिटी शोमधून अनेक स्पर्धकांना कोरिओग्राफ केल्यानंतर प्रसिद्धी मिळवली. त्यानंतर ते ‘झलक दिखला जा’ च्या ८ व्या सीझनमध्येही दिसले. तसेच ‘नच बलिये’ या डान्स रियालिटी शोच्या ५व्या, ६ व्या आणि ७ व्या सीझनसाठी वैभव घुगेने कोरिओग्राफी केली. अनुभवी डान्सर आणि गुरु वैभव घुगे यांनी त्यांच्या कला आणि निष्ठेने त्यांच्या अनेक डांसरसना करियरचा आकार दिला आहे आणि सोशल मीडियावर स्वतःसाठी एक मोठा फॅन बेस मिळवला आहे.
वैभव घुगे यांनी अलिकडेच त्यांच्या युट्यूब चॅनेलवर ‘सनशाईन म्युझिक’ च्या रिलीज झालेल्या म्युझिक व्हिडिओ ‘लगी पडी’मध्ये डान्सर अनुकृती मोनासोबत अभिनय केला. हे गाणे सध्या यूट्यूबवर ५०० हज़ार व्यूज प्लस गेले असून अजूनही ट्रेंडिंगवर आहे. वैभव घुगे यांनी गाण्याच्या लॉन्च आणि गाण्याला मिळणारा अप्रतिम प्रतिसाद पाहून आभार व्यक्त केले. कोरियोग्राफर मास्टर वैभव घुगे म्हणाले, “गाणे रिलीज झाल्यावर मला अंत्यत चांगले वाटतय. प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळत आहे. माझी १८ वर्षांची मेहनत सफल झाली आहे. त्यामुळे गाण्याने व्यूज ५०० हज़ार प्लस क्रॉस केले आहेत. अनेक प्रेक्षकांनी मला गाण्याबद्दल मेसेज करुन अभिनंदन व्यक्त करुन सकारात्मक संदेश देले आणि मी अशी बरीच गाणी बनवावे अशी प्रेक्षकांनी आपली इच्छा व्यक्त केली. मी माझ्या डान्सचा मार्गाने माझ्या प्रेक्षकांचे मनोरंजन नेहमी करीन अशी माझी इच्छा आहे. शेवटी म्यूजिक एल्बम करण्यचे माझे नेहमीच एक स्वप्न होते “.
‘लगी पडी’ हे गाणे एक अतिशय मनोरंचक आणि रंगीबेरंगी गाणे आहे. जो दमदार बीट्स आणि ग्रोव्ही डान्स मूव्ह्सने भरलेला आहे; एक जबरदस्त आणि रंगीन वातावरण तयार होते. हे गाणे प्रत्येक प्रेक्षकांच्या प्लेलिस्टमध्ये आहे. सनशाईन म्युझिकने याआधी ‘क्या तेरा रूथना जरूरी है’, ‘मैं जवा किथे’ ‘ख्वाबों खैलोन में’ आणि अशी अनेक गाणी रिलीज केली आहेत जे सर्वांना आवडतात.

ब्युरो न्यूज, कोकण नाऊ, मुंबई

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: