वैभववाडी नगरपंचायत निवडणूक काँग्रेस पक्ष स्वबळावर लढवणार

लवकरच सर्व जागेवर उमेदवार निश्चित करणार

कणकवली : वैभववाडीत होणाऱ्या नगरपंचायत निवडणुकीमध्ये कॉंग्रेस स्वबळावर लढणार आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलेल्या निर्देशानुसार सर्व नगरपालिका, नगर पंचायत , जिल्हा परिषद पंचायत समिती व ग्रामपंचायत येथे सर्व निवडणुका काँग्रेस हात या चिन्हावर लढवणार आहे तसेच सिंधुदुर्गाचे प्रभारी विनायक देशमुख यांनी सर्व नगर पंचायतीच्या निवडणुका काँग्रेस कार्यकर्त्यांना स्वबळावर लढण्याच्या सूचना दिल्या आहेत त्याला अनुसरून वैभववाडी नगरपंचायत मध्ये सर्व जागा काँग्रेस लढवणार आहे. सर्व कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागून उमेदवार चाचपणी करून उमेदवार सर्व जागेवर निश्चित करायचे ठरवले आहे . सर्व उमेदवारांना निवडून आणण्याचा निर्धार सर्व कार्यकत्यांनी केला आहे असे निरीक्षक महेंद्र सावंत यांनी जाहीर केले आहे. यावेळी कणकवली शहर अध्यक्ष , महेश तेली, निलेश मालडकर, कणकवली तालुका उपाध्यक्ष ,आनंद पवार ,भालचंद्र जाधव ,दादा नेवरेकर नाटेकर ,अशोक राणे, यश कुबल आदी उपस्थित होते.

दिगंबर वालावलकर, कोकण नाऊ, कणकवली.

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: