वेंगुर्ल्यात जीआय मानांकन नोंदणीसाठी मार्गदर्शन

वेंगुर्ले : कोकण हापूस आंबा उत्पादक व विक्रेते संस्था, कृषी पणन मंडळातर्फे शुक्रवार दिनांक २४ रोजी सकाळी १० वा. फळ संशोधन केंद्र वेंगुर्ले येथे जीआय मानांकन नोंदणीसाठी मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले आहे. जीआय मानांकन हे भविष्यात आंबा विक्रीसाठी ‘हापूस’ हे नाव वापरण्यासाठी सक्तीचे होणार आहे. त्यासाठी नोंदणी आवश्यक आहे. तसेच जिल्हा बँक हि जीआय नोंदणीकृत शेतकऱ्यांना सुलभ पद्धतीने कर्ज उपलब्ध करून देण्याच्या विचारात आहे. या शिबिराला मार्गदर्शन करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. विवेक भिडे व मुकुंदराव जोशी उपस्थित राहणार आहेत. तरी ईच्छुक आंबा बागायतदारांनी सातबारा, ८-अ ,पॅनकार्ड,दोन फोटो, कराराच्या बाग असल्यास सदर मालकाचा सातबारा आणावा. अधिक माहितीसाठी सचिन गावडे (७०६६८५१६०८), सागर गडेकर यांच्याशी संपर्क साधावा.

ब्युरो न्यूज, कोकण नाऊ, वेंगुर्ले

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: