वेंगुर्ल्यात ‘क्लिनेथॉन’ स्पर्धेने गाठले यशाचे शिखर!

वेंगुर्ले : वेंगुर्ला नगर परिषदेकडून आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छ, क्रीडा, सांस्कृतिक महोत्सव २०२० निमित्त राज्यस्तरीय क्लिनेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होत. २१ किलोमीटर, १० किलोमीटर व ५ किलोमीटर अशा तीन स्तरावर ही स्पर्धा घेण्यात आली.

स्वच्छतेचा संदेश घेऊन हजारोंच्या संख्येने सहभागी झालेले स्पर्धक वेंगुर्ला शहरातील रस्त्यावर धावले. सिंधुदुर्ग जिल्ह्याबरोबरच जिल्ह्याबाहेरील स्पर्धकही या स्पर्धेत सहभागी झालेले. नगरसेवकांच्या प्रमुख उपस्थितीत नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून स्पर्धेची सुरुवात करण्यात आली. सर्वप्रथम २१ किमी. त्यांनतर १० किमी, आणि त्यानंतर ५ किमी. धावण्याची स्पर्धा रंगलेली पाहायला मिळाली. या स्पर्धेबाबत सहभागी झालेल्या मान्यवर स्पर्धकांनी आपली मते व्यक्त केली. स्पर्धक नियोजित मार्गावरून धावत असताना गावातील नागरिक, शालेय विद्यार्थी त्यांना प्रोत्साहन देताना पाहायला मिळालेत. स्पर्धेत विजेत्या झालेल्या स्पर्धकांनी स्पर्धेच्या आयोजनाबाबत गौरवोद्गार काढले. स्वच सुंदर वेंगुर्ल्याच्या इतिहासात अशा प्रकारची पहिल्यांदाच सुरू झालेली स्पर्धा प्रत्येक वर्षी व्हावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

साईनाथ गावकर, कोकण नाऊ, वेंगुर्ला

Jump Net
Mai Hyundai Aura

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: