वेंगुर्लेत भाजपा व विविध संस्थांच्या वतीने २६ / ११ मधील शहीदांना श्रद्धांजली

सावंतवाडी: 13 वर्षापूर्वी मुंबईत झालेल्या २६/११ दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या महाराष्ट्र पोलिस दलातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना तसेच मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना आज वेंगुर्ला भाजप व नागरिकांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली.

यावेळी वेंगुर्ला सागररत्न मत्स्य बाजारपेठ समोरील मोकळ्या जागेत भारतीय जनता पार्टी वेंगुर्ला तसेच विविध संस्था व  नागरिकांच्या वतीने मेणबत्ती  लावून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली तसेच भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी भाजपा जिल्हा  सरचिटणीस प्रसंन्ना देसाई , नगराध्यक्ष दिलीप गिरप , उपनगराध्यक्षा शितल आंगचेकर , भाजप जिल्हा उपाध्यक्ष अॅड.  सुषमा प्रभूखानोलकर, नगरसेवक  प्रशांत आपटे , नगरसेवक धर्मराज कांबळी , नगरसेविका साक्षी पेडणेकर , नगरसेविका कृपा गिरप- मोंडकर , नगरसेविका श्रेया मयेकर , नगरसेविका पूनम जाधव, परबवाडा सरपंच पप्पू परब , रा.स्व.संघाचे बागलकर सर, विजय मोरजकर,ता.उपाध्यक्ष मनवेल फर्नांडिस , विश्व हिंदु परिषदेचे  मिलिंद पिंजाणी , डॉ दर्षश पेठे , महीला मोर्चा च्या वृंदा मोर्डेकर, विनय मोरजकर,व्यापारी संघाचे  बाबा दिपनाईक , ओंकार चव्हाण , कमलेश सामंत , शिवदत्त सावंत , शैलेश मयेकर , खर्डेकर महाविद्यालयाचे संजय पाटील आदी उपस्थित होते..

रामचंद्र कुडाळकर, कोकण नाऊ, सावंतवाडी

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: