वीज जोडणी खंडित करण्याच्या कारवाई विरोधात भाजपाचे ​२४ रोजी आंदोलन


जेलभरो आंदोलनाच्या माध्यमातुन जनतेच्या आवाजाला वाचा फोडणार

कणकवली: ​राज्यातील शिवसेना काँग्रेस व राष्ट्रवादी सरकारने विज बिल माफीची घोषणा करून सर्वसामान्य ग्राहकांची फसवणूक केली. आता तर वीज मंत्र्यांनी ज्यांची बिले थकीत आहेत त्यांची वीज पुरवठा बंद करण्याची घोषणा केली. त्यामुळे या राज्य सरकारच्या कारभाराविरोधात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघांमध्ये जेलभरो आंदोलन करण्यात येईल. सिंधुदुर्गात  कुडाळ मालवण मतदारसंघात माजी खा.निलेश राणे,कणकवली आमदार.नीतेश राणे,सावंतवाडी राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली जेलभरो आंदोलन छेडण्यात येणार आहे. तसेच माजी मुख्यमंत्री नारायण राणे हेदेखील या आंदोलनात मार्गदर्शन करतील अशी माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिली.
कणकवली येथील भारतीय जनता पार्टी कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी माजी सभापती सुरेश सावंत उपस्थित होते.
२४ रोजी राज्यभर भाजपाने जेलभरो आंदोलन पुकारले आहे. कणकवली, कुडाळ ,सावंतवाडी या तीन विधानसभा क्षेत्रात जेलभरो आंदोलन होणार आहे.आघाडी सरकारच्या तीनही पक्षात एकमत नसल्याने वीज ग्राहकांना फटका बसला आहे.वीज बिल माफीची ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी घोषणा करुनही वीज बिल माफी झाली नाही.कारण अर्थमंत्री अजित पवार यांनी नकार दिला ,ते दुसऱ्या पक्षाचे आहेत. सर्व मुख्यमंत्र्यांची वीजबिल माफी संदर्भात विरोधात भूमिका राहिली.
लॉकडाऊन मध्ये वीज बिल माफ होणार असल्याने ग्राहकांनी बिले भरली नाहीत.पालकमंत्री वीज मिटर  कनेक्शन कापू नका,असे बोलले आहेत. पण प्रत्यक्षात  जिल्हा वीज अधीक्षक अभियंता  यांच्याशी चर्चा केली असता कोणताही आदेश नसल्याचे ते सांगत आहेत .तत्पूर्वी वीज बिल भरणार नाहीत,त्यांची वीज तोडा असे आदेश मंत्री नितीन राऊत यांनी केले.त्यानुसार वीज मीटर तोडणी केली जात आहे,ज्यांचे मीटर कापले त्यांची सह्याची मोहीम हाती घेतली येणार असल्याचे भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी सांगितले आहे.
राज्यातील आघाडी सरकारला येत्या अधिवेशनात आम्ही जाब विचारणार आहोत.पहिल्यादा वीजबिल माफी साठी ५८०० कोटींची तरतूद शासनाला करावी लागणार आहे.अवाजवी बिले कमी केली पाहिजेत,अशा लोकांना बिलं दुरुस्त करून घ्या.
१०० ते ३०० युनिट वापर करणारे  ग्राहक आहेत,त्यांना राज्य सरकारने सवलत द्यावी,मध्यप्रदेश व गुजरात सरकारने दिली आहे.विद्युत शुल्क ९५०० कोटी जमा होते ती  जमा रक्कम वीज माफी साठी वापरावी, अशी मागणी राजन तेली यांनी केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस ​असताना  थकबाकी माफी २५ लाख कृषी ग्राहक होते, त्यांचे वीज पुरवठा खंडित केला नव्हता.कृषी संजीवनी योजना लागू करता,दुसरीकडे थकबाकी म्हणून विद्युत पुरवठा खंडित करता,हा कारभार थाबवा. राज्य सरकारने त्वरित आदेश मागे न घेतल्यास भाजप आंदोलन छेडणार आहोत.त्याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची असेल,असा इशारा राजन तेली  यांनी दिला.
हा मोर्चा सर्व नियम पाळूनच काढला जाईल, एकीकडे मुस्कटदाबी करायची,दुसरीकडे नियम पाळायचे. अधीक्षक अभियंत्यांनी पालकमंत्री यांचे आदेश पाळतो असे जाहीर करावे.अनेक घोषणा झाल्या पण कोणीही आदेश पाळत नाही.कारवाई झाल्यास आम्ही समर्थ आहोत.सरकारने प्रदेशाध्यक्ष यांच्याशी चर्चा करावी,आम्ही कायदा हातात घेत नाही,लोकांच्या मागण्या साठी आमचे आंदोलन आहे.आमचं भांडण वीज अधिकाऱ्यांशी नाही.वीज वितरण अधीक्षक जबाबदारी घेत नाहीत.आम्ही विश्वास कोणावर ठेवायचा? असा सवाल उपस्थित करत राजन तेली यांनी २४ फेब्रुवारीला जेलभरो आंदोलन छेडणार असल्याचा इशारा दिला आहे.

दिगंबर वालावलकर ​, कोकण नाऊ, ​कणकवली

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: