विश्व हिंदु परिषद, प्रखंड – वेंगुर्ले च्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन

सावंतवाडी : विश्व हिंदु परिषद, प्रखंड – वेंगुर्ले च्या वतीने साईदरबार हाॅल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ​२९ रक्तदात्यांनी रक्तदान केले. कोरोना च्या महामारीत रक्ताची आवश्यकता असल्याने रक्तदानाचे आयोजन करण्यात आले होते .
   या रक्तदान शिबिराचे उद्घाटन भारतमातेचे पुजन करुन व दीपप्रज्वलन करुन नगराध्यक्ष राजन गिरप यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, विश्व हिंदु परिषदेचे डाॅ. राजन शिरसा​ट​, अरुण गोगटे, गिरीश फाटक, आपा धोंड, ​ऍड. श्रीकृष्ण ओगले , डाॅ.दर्शन पेठे व्यासपीठावर उपस्थित होते .
  या रक्तदान शिबिराला विश्व हिंदु परिषदेचे जिल्हा संघटन मंत्री रविंद्र तांबोळकर, अजित फाटक, लक्ष्मीकांत कराड, शिवाजी पाटील​,​ अभी वेंगुर्लेकर इत्यादी मान्यवरांनी भेट दिली.
  यावेळी जिल्हा रुग्णालय रक्तपेढीचे डाॅ. राजेश पालव, हेमांगी रणदिवे, उल्हास राणे, सुरेश डोंगरे, नितीन गावकर आदींनी सहकार्य केले.​​


रामचंद्र कुडाळकर, कोकण नाऊ, सावंतवाडी.

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: