वाहन चालकांनी नियमांचे पालन करणे आवश्यक

बांदा : भारतात सर्वाधिक बळी हे रस्ते अपघातात जातात. वाहतुकीचे नियम न पाळल्याने हजारो संसार उध्वस्त झाले आहेत. यासाठी युवा पिढीने वाहन चालवताना काळजी घ्यावी. वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. तसेच वाहतूक चिन्हांची माहिती करून घ्यावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बालाजी वर्दन यांनी केले आहे. येथील खेमराज मेमोरियल प्रशालेत उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे रस्ता सुरक्षा सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वर्दन बोलत होते. यावेळी वर्दन यांनी वाहतूक नियम, रस्ते अपघात, गाडीची वेगमर्यादा याबाबत मार्गदर्शन केले. स्वागत व प्रास्ताविक पी.यु. देसाई यांनी केले. यावेळी वाहतूक पोलीस विजय जाधव, सहाय्यक शिक्षक पी.यु. देसाई मोटार वाहन निरीक्षक उदयकुमार केमळे, आदी उपस्थित होते.

ब्युरो न्यूज, कोकण नाऊ, बांदा

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: