वाभवे-वैभववाडी नगरपंचायत निवडणुकीसाठी पहिल्या दिवशी एकही अर्ज नाही

वैभववाडी: वाभवे-वैभववाडी नगरपंचायत निवडणुकी साठी नामनिर्देशन पत्र दाखल करायला बुधवार पासुन सुरुवात झाली असून आज पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झालेला नाही पहिला दिवस निरंक गेला आहे.
नगरपंचायत निवडणूकीसाठी इच्छुक उमेदवारांची गर्दी वाढताना दिसत आहे.आरक्षित जागेवरील उमेदवार जात प्रमाणपत्र मिळविण्यात व्यस्त आहेत. तर खुल्या प्रवर्गातील जागेवर इच्छुकांची वाढती गर्दी पक्षप्रमुखांची डोकेदुखी ठरत आहे. या निवडणुकीत शिवसेना भाजप या दोन पक्षामध्ये खरी लढत होणार आहेत. शिवसेना आघाडीतील काँग्रेस व राष्ट्रवादीत काँग्रेस पक्षाने स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मनसे एकला चलोरेच्या भुमिकेत आहे.एकूणच निवडणूक रंगदार होणार आहे.

प्रतिनिधी, कोकण नाऊ, वैभववाडी

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: