वागदेत प्रशिक्षणातून दिली रोजगाराची संधी

कणकवली : संकल्प प्रतिष्टानच्या वतिने गेली आठ वर्षे उद्योग, व्यवसाय, कृषी क्षेत्रात शेतकरी, सुसूक्षित तरुण तरूणीना मार्गदर्शन प्रशिक्षण देण्यात येत आहे. आजच्या पिढीतील मुलांना स्वतःच उद्योग करता यावा यासाठी रविवारी वागदे येथे गांडूळ खत बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आल. या प्रशिक्षणाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला. 
         संकल्प प्रतिष्ठान च्या वतीने कणकवली तालुक्यातील वागदे गावात सुशिक्षित तरुण, महिला, शेतकरी वर्गाला सोशल मीडियावर एकत्रित करून विद्यार्थी विद्यार्थीना स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी विविध क्षेत्राचं एक दिवशीय मार्गदर्शन व प्रशिक्षण वागदे येथे देण्यात आलं. 
          बेरोजगारांना १ रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी तसेच इतरांनाही रोजगार उपलब्ध करून द्यावा यासाठी हे मार्गदर्शनपर शिबीर आयोजित केले होते. संकल्प प्रतिष्ठान तर्फे असे कार्यक्रम नेहमीच आयोजित केले जातात. रासायनिक खतांचा आज जास्तीत जास्त वापर होताना आपल्याला दिसून येत तर या रासायनिक खतांना १ पर्याय म्हणून गांडूळ खताचा वापर करू शकतो. व त्याचा फायदा कसा होऊ शकतो याचे प्रशिक्षण या शिबिरातून देण्यात आले.           तसेच या गांडूळ खटाला मागणी सुद्धा भरपूर आहे. या खतामधून रोजगार निर्मितीही होऊ शकते. हे या प्रशिक्षणातून सांगण्यात आले. आठ वर्षात अनेक विद्यार्थी प्रशिक्षण घेऊन स्वतःचा उद्योग धंदा करत आहेत. यावेळी २०  विद्यार्थी गां सिधुदुर्ग जिल्ह्यातून उपस्थित होते. तरुण पिढीला एक दिशा देण्याचे काम संकल्प प्रतिष्ठान च्या वतीने  यांच्या करण्यात येत आहे.

विराज गोसावी, कोकण नाऊ, कणकवली. 

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: