रोटरी सेल्फी विथ रांगोळी स्पर्धेचा निकाल जाहीर


कणकवलीच्या ​अनिता राणे प्रथम

कुडाळ : रोटरी डिस्ट्रिक्ट ​३१७० आयोजित सेल्फी विथ रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक ​​अनिता राणे​-​ हळवल कणकवली, द्वितीय क्रमांक सौ तेजस्विता नार्वेकर​-​ उभादांडा वेंगुर्ला, तृतिय क्रमांक भावना प्रभू​-​ कुडाळ यांना जाहिर झाला आहे.  येत्या १० जानेवारीला कुडाळ येथे या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे.

सौ तेजस्विता नार्वेकर- द्वितीय क्रमांक, उभादांडा वेंगुर्ला
भावना प्रभू, तृतीय क्रमांक, कुडाळ


     रोटरी  डिस्ट्रिक्ट ३१७० चे गव्हर्नर  रो.संग्राम पाटील व त्यांच्या पत्नी  रो.उत्कर्षा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रोटरी डिस्ट्रिक्ट ३१७०, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व रोटरी क्लबच्या सहकार्याने मागील वर्षात दीपावली निमीत्त ऑनलाईन रोटरी सेल्फी विथ रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. दिनांक २५ डिसेंबर २०२० रोजी पत्नी  रो.उत्कर्षा पाटील यांनी स्वतः परीक्षण करून प्रथम तीन क्रमांक आणि दहा उत्तेजनार्थ विजेत्यांची नावे घोषित केली.
     या स्पर्धेमध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी,कोल्हापूर,सांगली,तसेच गोवा. व कर्नाटक ,छत्तीसगड, बिहार मधील एकूण ८० स्पर्धक सहभागी झाले होते.​ ​या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक रुपये ५०००/- , द्वितीय  क्रमांक रुपये ३०००/-, तृतीय क्रमांक रुपये २०००/- आणि उत्तेजनार्थ पारितोषिके प्रत्येकी एक हजार रुपये प्रमाणे होती. सर्व विजेत्यांना १० जानेवारी रोजी कुडाळ येथे पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. .
      या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे प्रथम क्रमांक – अनिता अविनाश राणे, (हळवल-कणकवली), द्वितीय क्रमांक – तेजस्विता नार्वेकर (उभादांडा वेंगुर्ला), तृतीय क्रमांक भावना प्रभू, कुडाळ, उत्तेजनार्थ दहा पारितोषिके – सौ प्रीती साईनाथ सीतावर (सावंतवाडी),
भारती सचिन देशमुख (सावंतवाडी),  प्रणाली दिलीप चव्हाण (मालवण), प्रथमेश वेर्णेकर (कारवार), प्रीती सुहास पावसकर (कणकवली), पूर्वा रामदास चांदरकर (नेमळे सावंतवाडी), सलौद्दिन गुलाब तहसीलदार (सावंतवाडी), श्रेया संजय गवस (माणगाव ,कुडाळ), विनिता प्रशांत पांजरी (मालवण), योगिता आत्माराम शिरोडकर कुडाळ.
    या सर्व विजेत्या स्पर्धकांना रोटरी इंटरनॅशनल कडून पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.​ ​सर्व सहभागी स्पर्धकांचेही रोटरी इंटरनॅशनल कडून हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे.  ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी इव्हेंट चेअरमन उपप्रांतपाल प्रणय तेली, उपप्रांतपाल दादा कुडतरकर, वेब मास्टर – प्रसन्ना मयेकर​,​ मालवण​ ​रोटरी क्लब कुडाळ अध्यक्ष​ ​सचिन मदने,​ ​रोटरी क्लब सावंतवाडी अध्यक्ष राजेश नवांगुळ,​ ​रोटरी क्लब कणकवली अध्यक्ष लऊ पिळणकर,​ ​रोटरी क्लब मालवण अध्यक्ष महेंद्र गोवेकर,​ ​रोटरी क्लब वेंगुर्ले अध्यक्ष गणेश अंधारी,​ ​रोटरी क्लब शिरोडा अध्यक्ष मधुसुदन उर्फ योगेश महाले, वर्षा बांदेकर यांनी सह्कार्य केले.

निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.​​

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: