राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्हा बँक निवडणूक लढविण्याच्या पावित्र्यात

योग्य पर्याय आल्यास ठीक..अन्यथा निवडणूकीच्या रिंगणात
जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांची माहिती

सावंतवाडी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक लढविणार आहे. सदयस्थितीत आमचे सहा सदस्य आहेत. त्यादृष्टीने आमची तयारी आहे. या पार्श्वभूमीवर प्रविण भोसले यांच्यासह पाच जाणत्या पदाधिकाऱ्यांकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे. अशी माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी सावंतवाडी दिली. विद्यमान जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतिश सावंत यांच्या म्हणण्यानुसार जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी, असे आमचेही म्हणणे आहे. मात्र तसा सक्षम प्रस्ताव समोरुन येणे गरजेचे आहे. असे सामंत म्हणाले. सावंतवाडीत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत सामंत बोलत होते. यावेळी ते म्हणाले, या ठिकाणी जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी. कोरोना काळात ही निवडणूक होवू नये, असे आमचे मत आहे. परंतू तसा सक्षम प्रस्ताव येणे गरजेचे आहे. अन्यथा निवडणूकीबाबत कोणते निर्णय घ्यावे ? याची जबाबदारी ही पाच जाणत्या पदाधिकाऱ्यांकडे देण्यात आली आहे. यात प्रविण भोसले. सुरेश दळवी, नंदूशेठ घाटे, व्हिक्टर डान्टस, एम. के. गावडे आदींकडे देण्यात आली आहे. त्यांनी याबाबत निर्णय घेणे गरजेचे आहे ,असे ते म्हणाले. यावेळी माजी राज्यमंत्री प्रविण भोसले, तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, निरीक्षक शिवाजी घोगळे, आशिष कदम, हिदायतुल्ला खान आदी उपस्थित होते.

रामचंद्र कुडाळकर, कोकण नाऊ, सावंतवाडी

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: