राठीवडे येथे दुकानावर आंब्याचे झाड कोसळून ५० हजाराचे नुकसान

पोईप ​: ​राठीवडे गोंजिचीवाडी येथील प्रकाश विनायक मेस्त्री यांच्या हिवाळे तिठ्यावरील दुकानावर आंब्याचे झाड पडुन नुकसान झाले आहे​. ​
सदर घटना सोमवारी सायंकाळी ​४ ​वाजुन ​३० ​​मिनिटांनी घडली​. ​या​ ​दुकानात असलेली ​त्यांची पत्नी दोन लहान मुले सुदैवाने बचावली​.​ या​ ​परिसरात सोमवारी सायंकाळी मुसळधार पाऊस व वारा सुरू असताना प्रकाश विनायक मेस्त्री यांच्या दुकानानजीक असलेले आंब्याचे झाड दुकानावर मोडुन पडले यावेळी दुकानात मेस्त्री यांची पत्नी सरिता व दोन लहान मुले होती​. ​
सदर आंबा कोसळताना झालेल्या आवाजाने सरिता मेस्त्री या लहान मुलांना घेऊन बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला​. ​या​ ​घटनेत प्रकाश विनायक मेस्त्री यांच्या दुकानातील सर्व साहित्य व छपरावरील ​पत्र्याचे नुकसान झाले​.​ दरम्यान ​काही मिनिटांपूर्वी प्रकाश विनायक मेस्त्री हे तेथे आले असता त्याच्या हि डोक्यावर पत्रा पडुन दुखापत झाली आहे​. ​

या घटनेची खबर मिळताच राठीवडे पोलिस पाटील विष्णू जिकमडे माजी उपसभापती अरूण मेस्त्री तसेच पोईप मंडळ अधिकारी राजेंद्र शिंगाडे हिवाळे तलाठी मनेर व ग्रामपंचायत सदस्य स्वप्नील पुजारे प्रकाश विठठल मेस्त्री यांनी तात्काळ जावुन घटनेची पाहणी केली ​व ​पंचनामा केला ​५० हजारांचे नुकसान झाले आहे​​. 


संतोष हिवाळेकर, कोकण नाऊ, पोईप. 

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: