राज्यात मध्यावधी निवडणुकांची शक्यता नाही; खडसेंचा पक्षाला घरचा आहेर

नवी मुंबई : राज्यातील महाविकास आघाडीचे शिवसेनेच्या नेतृत्वाखालील सरकार कोसळून राज्यात केव्हाही मध्यावधी निवडणुका होतील, अशी शक्यता भाजपचे नेते वर्तवित असले तरी भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मात्र राज्यात मध्यावधी निवडणुका होणार नसल्याचा दावा करून पक्षातील नेत्यांना सबुरीचा दिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

नवी मुंबईत भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे आजपासून दोन दिवसांचे राज्यव्यापी अधिवेशन सुरू झाले आहे. यावेळी ते बोलत होते. दोन दिवस चालणाऱ्या या अधिवेशनाला राज्यभरातून दहा हजार पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. उद्या (दि.१६) भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा अधिविशनाला उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार आहे. या सरकारमध्ये काही गोष्टींवर मतभेद आहेत. हे मतभेद आता उघड होऊ लागले आहेत. त्यामुळे तिढा वाढून हे सरकार पडेल, पण राज्यात मध्यावधी निवडणुका होणार नाहीत, असंही एकनाथ खडसे यांनी सांगितलं.

ब्युरो न्यूज, कोकण नाऊ, नवी मुंबई.

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: