राजापूरमध्ये गणेश विसर्जनावेळी पडवे बंदर येथे दोघे जण बुडाले

राजापूर : राजापूर तालुक्यातील पडवे बंदर पडवे येथे जैतापूर राजापूर खाडी पात्रात गणेश विसर्जनासाठी गेलेले दोन तरुण खाडीत पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. कुलदीप वारंग आणि रोहित भोसले बुडावेल्या तरुणांची नावे असून त्यांचा शोध कार्य सुरू आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार कुलदीप वारंग व रोहित भोसले हे सध्या मुंबई येथे राहत असून गणेशोत्सवासाठी गावी आले होते. गुरुवारी सायंकाळी गणेश विसर्जनासाठी पडवे बंदर येथील खाडीवर गेले होते. त्यावेळी विसर्जनासाठी ते पाण्यात उतरले.मात्र यामध्ये पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडाले. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.सागरी ग्रामिण पोलीस ठाणे नाटेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप काळे व त्यांचे सहकारी घटना स्थळी पोहचले.बंदरा पर्यंत जाणारा रस्ता पायवाटेचा असल्याने मदत कार्यात अडथळे निर्माण होत आहेत. रात्री उशिरापर्यंत दोघांचाही शोध घेण्याचे काम सुरू होते.जिरक्षक नसल्याने जैतापूर पासून सर्वच गणपती विसर्जन घाटावर ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली असून जिवरक्षक मनोरे शोभेची बाहुली बनून उभे आहेत.

सचिन नारकर, कोकण नाऊ, जैतापूर

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: