राजापूरच्या मुलांनी आणि शिक्षकांनी दाखवून दिला मानवता हेच धर्म सत्य

राजापूर : अतिवृष्ठी मुळे संंपुर्ण कोल्हापूर सांगली भागात महापूर आला आहे काहि अंशी पुराच्या पाण्याची पातळीत घट होत कोल्हापूर पूर्व पदावर येत आहे अशा आपतकालीन घटनेच्या वेळी जात पात धर्म विसरून मानवता हाच धर्म सत्य आहे हे मनाशी बाळगत राजापूर हायस्कूलचे शिक्षक व मुलांनी चार दिवस मदत कार्यात सहकार्य केले.


       अतिवृष्ठी मुळे संंपुर्ण कोल्हापूर सांगली भागात महापूर आला आहे. काहि  अंशी पुराच्या पाण्याची पातळीत घट होत कोल्हापूर पूर्व पदावर येत आहे अशा वेळी मदत कार्याची मोठ्या प्रमाणात गरज भासत असते अशा वेळी गेले १० दिवस राजापूर हायस्कूलचे विज्ञान तसेच क्रीडा व एन.सी.सी.चे शिक्षक विकास कुंभार व २२ मुले कोल्हापूरला एन.सी.सी.कॅम्प साठी गेली होती एन.सी.सी.कॅम्प ४ दीवसापूर्वीच संपला होता. तसेच महाराष्ट्र बटालियन एन. सी.सी.कोल्हापूर येथे झालेल्या स्पर्धत राजापूर हायस्कूल राजापूरचा कॅडेट अभिषेक जाधव याची पूर्ण ४०० कॅडेटमधून बेस्ट कॅडेट म्हणून निवड तसेच बेस्ट फायरिंग स्पर्धत राज बिर्जे याला सिल्वर मेडल प्राप्त झाले. यांच्या उत्साह मुलांच्या चेहऱ्यावर दिसत होता.
     परंतू कोल्हापूरची पूरस्थिती भयावह असल्यामुळे तेथे मुले अडकूण पडली होती कॅम्प संपल्यामुळे मुलांना घरी येण्याची ओढ लागली होती त्यात काहि मुले तापानी आजारी होती परंतु मुले आर्मी कॅम्प मध्ये सुखरूप होती. 


         अशा परीस्थितीत आपल्यामध्ये असलेला माणूसकिचा धर्म पाळत या मुलांनी आर्मी कॅम्प मधुन पूरग्रस्ताना मदत कार्य केले त्या ठीकाणी ही मुले व शिक्षक मदत कार्य करत होते आपण संकटात  असताना दुसर्याला मदत करणे ही भावना त्या निमीत्ताने मुलांचा मनात रूजतेय व मुलांना आपत्ती व्यवस्थापनाचा मोठा अनुभवही मीळतोय हे त्या निमित्ताने अधोरेखित झाले 


      राजापूर हायस्कूल चे हरहुन्नरी कर्तबगार शिक्षक विकास कुंभार यांना हेलीकाॅप्टर मघुन खाद्यपदार्थाचे पॅकट तसेच पाणी वाटण्याची व सेवा करण्याची संधी मिळाली अशा शिक्षकांबद्द्ल ग्रामस्थांना अभिमान वाटतोय. हे शिक्षक विकास कुंभार व एन.सी.सी.चे विद्यार्थी यांचे संपूर्ण राजापूर तालूक्यात कौतुक होत आहे. आज त्यांच्या परतीचा दिवस असून राजापूरवासीय मुलांच्या व शिक्षकांच्या भेटी साठी आतूर झाली आहेत.


सचिन नारकर, कोकण नाऊ, राजापूर. 

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: