मोफत सात – बारा योजनेचा तहसीलदार आर.जे.पवार यांच्या हस्ते कणकवलीत शुभारंभ

कणकवली तालुक्यातील 36 तलाठी सजानिहाय प्रातिनिधिक स्वरूपात शेतकऱ्यांना केले सात – बाराचे वितरण

कणकवली : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त खातेदारांना मोफत सात – बारा देण्याच्या योजनेचा शुभारंभ कणकवली तालुक्यात तहसीलदार आर.जे. पवार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी कणकवलीतील 5 शेतकरी खातेदारांना प्रातिनिधिक स्वरूपात मोफत सात – बाराचे वितरण करण्यात आले. गांधी जयंतीचे औचित्य साधत हा शुभारंभ करण्यात आला. कणकवली तालुक्यात 36 तलाठी सजानिहाय प्रत्येकी पाच खातेदारांना प्रातिनिधिक स्वरूपात मोफत सात – बाराचे वितरण करण्यात आले. कणकवली मध्ये तहसीलदार आर.जे.पवार यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी महसूल नायब तहसीलदार एस.व्ही.राठोड, मंडळ अधिकारी मेघनाथ पाटील व खातेदार शेतकरी उपस्थित होते. तालुक्यातील सर्व खातेदार शेतकऱ्यांना सुधारित नमुन्यातील संगणकीकृत डिजिटल स्वाक्षरी असलेला सात बारा उतारा २ ऑक्टोबर पासून देण्यात येणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाने हा उपक्रम राबविला असून, खातेदार शेतकऱ्यांना एकदा पूर्णता मोफत सातबारा दिले जाणार आहेत.

दिगंबर वालावलकर , कोकण नाऊ, कणकवली

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: