मोफत शिष्यवृत्ती सराव परीक्षा हा केंद्रशाळा शेर्पेच्या शतक महोत्सव समितीचा स्तुत्य उपक्रम – रवींद्र जठार

खारेपाटण : केंद्रशाळा शेर्पेचे सन २०२० हे स्थापनेचे शतक महोत्सवी वर्ष असून, त्यानिमित्त तळेरे प्रभागातील इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित जि. प. वित्त व बांधकाम सभापती रवींद्र जठार, कणकवली पंचायत समिती सभापती दिलीप तळेकर, शेर्पे सरपंच निशा गुरव, उपसरपंच विलास पांचाळ, शिक्षण विस्तार अधिकारी सुहास पाताडे, सुभाष शेलार, शेर्पे शतक महोत्सव समिती अध्यक्ष परशुराम बेळणेकर, मुख्याध्यापक दशरथ शिंगारे, श. म. समिती उपाध्यक्ष जाधव, महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्ष भूषण शेलार आदी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे स्वागत सुभाष शेलार, परशुराम बेळणेकर, मुख्याध्यापक-दशरथ शिंगारे यांनी केले. मोफत सराव परीक्षेचे उद्घाटन रवींद्र जठार आणि दिलीप तळेकर यांच्या हस्ते झाले.

अस्मिता गिडाळे, कोकण नाऊ, खारेपाटण.

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: